दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी बुद्रुक येथील अवसरी बुद्रुक दूध संस्थेला सर्वाधिक दूध घालणाऱ्या पाच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रतिलिटर 2 रुपये प्रमाणे एकुण सुमारे 3 लाख 71 हजार 130 रुपयांचा बोनस दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक रमेश खिलारी, संस्थेचे माजी अध्यक्ष अनिल हिंगे, माजी सरपंच बबन हिंगे, सरपंच पवन हिल, उपसरपंच सचिन हिंगे, कात्रज अवसरी दुध चिलिंग सेंटर प्रमुख अशोक जाधव आदी उपस्थित होते. सर्वाधिक संस्थेला दूध घालणारे दूध उत्पादक शेतकरी पुढीलप्रमाणे – बाळासाहेब शिंदे यांना 26 हजार 100 रुपये, जयसिंग फुलसुंदर 24 हजार 850 रुपये, गोरक्ष टाव्हरे 23 हजार 460 रुपये, काळुराम येहळे 22 हजार 970 रुपये आणि बाळासाहेब येहळे यांचा 22 हजार 210 रुपये बोनस देवून सन्मान करण्यात आला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब येहळे यांनी दिली. संस्थेने वर्षभर 1 लाख 85 हजार 582 लिटर दूध खरेदी केले आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव मच्छिंद्र हिंगे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)