दूध उत्पादक गवळ्यांची दिवाळी गोड

File Photo

मंचर- सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या मंचर येथील विकास सहकारी दूध संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्ताने दूध उत्पादक गवळ्यांना प्रति लीटर 4 रुपये प्रमाणे एकूण 23 लाख 68 हजार रुपये बोनस म्हणून वाटप केल्याची माहिती संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब विठ्ठलराव बाणखेले यांनी दिली. विकास दूध संस्थेने चालू आर्थिक वर्षात 60 हजार 714 लिटर दूध खरेदी केले असून संस्था गवळ्यांना 26-27 रुपये प्रति लीटर दूधदर देते. संस्थेचे रोजचे संकलन 1800 लीटर इतके असून 140 दूध उत्पादक संस्थेला पुरवठा करीत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबाजी मुळे व संस्थेचे संचालक प्रभाकर लोंढे यांनी दिली. बोनस वाटप प्रसंगी संस्थेचे संचालक पंडीतराव निघोट, बाळासाहेब थोरात, पंढरीनाथ गांजाळे, माऊली जुन्नरे, निलेश गांजाळे, शोभा बाणखेले, संस्थेचे सचिव भाऊसाहेब शेवाळे, विकास केदार, संतोष शिंदे यांच्यासह दूध संस्थेचे सभासद उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)