दूध उत्पादकांची 225 कोटींची सबसीडी थकली

मुंबई – सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटीर पाच रूपयांची सबसीडी म्हणजेच अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता पण अद्याप त्यातील एक रूपयाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या सबसीडीपोटी सरकारकडून शेतकऱ्यांना किमान 225 कोटी रूपये मिळणे अपेक्षित होते पण सरकारने घातलेल्या विविध अटींमुळे ही शेतकरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकलेली नाही.

सहकारी दूध संघांनी सरकारकडे या अनुदान मागणीसाठी या आधीच अर्ज केले आहेत. पण या सरकारने या सोसायट्यांना हे दूध गायीचेच होते आणि ते केवळ शेतकऱ्यांकडूनच खरेदी करण्यात आले आहे हे सिद्ध करण्यास सांगितले आहे.

-Ads-

हे अनुदान शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याने त्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांची माहितीही सरकारने दूध सोसायट्यांकडे मागितली आहे. बॅंक खात्यांची माहिती मिळाल्यानंतर त्याची खातजमा केली जाईल आणि नंतर ही सबसीडी त्यांच्या खात्यात वर्ग केलीजाईल अशी माहिती दूग्ध विकास मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. राज्य सरकारने येत्या 1 ऑगस्ट पासून प्रतिलिटीर पाच रूपये या दराने सबसीडी देण्याचे घोषित केले आहे.

राज्यात जवळपास दहा लाख लिटर अतिरीक्त दूध दररोज निर्माण होते. हे दूध त्याची पावडर करण्यासाठी पाठवले जाते. त्यावर दरररोज 50 लाखांची सरकारी सबसीडी देय आहे. सरकारने लागू केलेल्या या नवीन नियमामुळे या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांची माहिती मिळवून ती सरकारी यंत्रणांना सादर करण्याची जिकीरीची उठाठेव आता सहकारी दूध सोसायट्यांना करावी लागणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)