दूधदरासाठी शिवरीत रास्ता रोको आंदोलन

खळद- बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने शिवरी (ता. पुरंदर) येथे सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर दुधाच्या दर वाढीबाबत शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून त्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष गणेश जगताप, अंकुश देशमुख, महादेव खेंगरे, एकनाथ कामथे, राधा जगताप यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. दूध दरवाढी बाबत राज्यभर आंदोलन झाले असता सरकारच्या वतीने दुधाला 25 दर जाहीर करण्यात आला. यानुसार दोन महिने दूध संघाने शेतकऱ्यांना 5 रूपये दर वाढ दिली. मात्र, सरकारच्या वतीने आजपर्यंत या दूध संघांना हे अनुदान मिळाले नाही. यामुळे आता या दूध संघाने अनुदान देणे थांबवले आहे. तर दोन महिन्यांत महिने जे अनुदान दिले असेल तेही परत घेण्याचा पवित्रा दूध संघाने घेतला असल्याने आता शेतकऱ्यांना फक्त 15 रूपये प्रमाणे दर मिळणार आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे तरी शासनाने याची तातडीने दखल घेत जाहीर केल्याप्रमाणे दरवाढ द्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल असा इशारा जगताप यांनी यावेळी दिला.
तर सध्या पिके धोक्‍यात आली असताना सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिरायती भागाला 50 हजार रूपये व बागायती भागाला एक लाख रुपये अनुदान जाहीर करावे, सरसकट कर्जमाफी करावी तसेच शेतीमालाला नवीन कायद्यानुसार हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)