कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – दुहेरी नागरिकत्वामुळे ऑस्ट्रेलियातील पाच खासदार अपात्र ठरले आहेत. न्यायालयाने दुहेरी नागरित्वाच्या कारणाने पाच खासदारांना अपात्र ठरवून त्यांचे सभासदत्व रद्द केले आहे. दुहेरी नागरिकत्वासंबंधी 117 वर्षे जुन्या प्रतिबंधाबाबत न्यायालयीन लढाई चालू होते. तिचा निकाल लागून न्यायालयाने या पाचही खासदारांची खासदारकी रद्द केली आहे.

रिकाम्या झालेल्या या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमुळे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांना संसदेत आपले बळ वाढवण्याची संधी मिळणार आहे. सध्या टर्नबुल यांच्या कॉन्झर्वेटिव्ह युतीच्या सरकारकडे आवश्‍यक बहुमतापेक्षा फक्त एकच मत जास्त आहे. आता त्यांना ही आघाडी वाढवण्याचे संधी प्राप्त झाली आहे.

विरोधी पक्षाचे खासदार केटी कॅलाघर यांचे प्रकरण एक महत्त्वाचा मुद्दा बनला होता. या प्रकरणात न्यायालयाने दुहेरी नागरिकत्वावरील बंदीची व्याख्या स्पष्ट केली. परिणामी केटी कॅलाघर यांच्याबरोबरच आणखी चार खासदारही अपात्र ठरून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)