दुहेरी टेनिस क्रमवारीत लिअँडर पेसची प्रगती पुन्हा अव्वल 50 मध्ये झेप

नवी दिल्ली – भारताचा अनुभवी टेनिसपटू लिअँडर पेसने अमेरिकेच्या जेम्स केरेटानीच्या साथीत न्यूपोर्ट बीच चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदामुळे लिअँडर पेसने आयटीएफ टेनिस विश्‍वक्रमवारीतील दुहेरीच्या मानांकन यादीत प्रगती केली असून तो पुन्हा एकदा टॉप-50 मध्ये दाखल झाला आहे.

न्यूपोर्ट स्पर्धेतील विजेतेपदामुळे लिअँडर पेसला 125 गुणांची कमाई करता आली. त्यामुळे त्याने थेट 14 क्रमांकांनी प्रगती केली असून आता तो दुहेरी विश्‍वक्रमवारीत 47व्या क्रमांकावर पोहोचला आहे. लिअँडर पेस या आठवड्यात जो सॅलिसबरी या ब्रिटिश खेळाडूच्या साथीत एक लाख 25 हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या डलास टेनिस स्पर्धेत उतरत आहे.

-Ads-

नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत तिमिया बाबोसच्या साथीत मिश्र दुहेरीचे उपविजेतेपद पटकावणारा रोहन बोपण्णा हा दुहेरी विश्‍वक्रमवारीत 20व्या क्रमांकावर असून तो भारताचा सर्वोच्च मानांकित खेळाडू आहे. डावखुरा दिविज शरण त्याच्या खालोखाल असून 3 गुणांची कमाई करून त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम 45व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

पुरुष एकेरी मानांकन यादीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या युकी भांब्रीने 8 क्रमांकांची प्रगती केली असून तो आता 118व्या स्थानावर पोहोचला आहे. रामकुमार रामनाथन (140), सुमित नागल (218), प्रजनेश गुणेश्‍वरन (244) आणि एन. श्रीराम बालाजी (391) हे भारतीय खेळाडू त्यापाठोपाठ आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)