दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बमुळे मध्य बर्लिन रिकामे

file photo

बर्लिन – दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब निकामी करण्यासाठी मध्य बर्लिनच्या रेल्वे स्टेशन परिसरातील हजारो घरे रिकामी करण्यास जर्मन पोलिसांनी सुरूवात केली आहे. दुसऱ्या महायुद्धातील 500 किलोचा मोठा बॉम्ब एका इमारतीमध्ये अजूनही जिवंत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

या परिसरातील रेल्वे, ट्राम आणि बससेवा थांबवण्यात आली, किंवा त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. पोलिसांनी स्पीकरवरून नागरिकांना या ऑपरेशनची माहिती दिली आणि घरे रिकामी करायला लावली आहेत. मध्य रेल्वेस्टेशनपासून 800 मीटरच्या परिसरातील सर्व घरे रिकामी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या परिसरात रेल्वे स्टेशनव्यतिरिक्‍त लष्करी रुग्णालय, अर्थ मंत्रालयाचे कार्यालय, आर्ट गॅलरी, एक संग्रहालय आणि बीएनडी गुप्तचर संस्थेचे नवीन मुख्यालयही आहे. या परिसरातील सर्व रहिवाशांना जोपर्यंत पुढील आदेश मिळत नाही, तोपर्यंत घरांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे. बॉम्ब निकामी पथक येण्यापूर्वी सर्व घरांमध्ये जाऊन तपासणीही केली जाणार आहे. या सर्व नागरिकांसाठी तात्पुरती निवासाची सुविधा केली गेली आहे.

-Ads-

जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांचे कार्यालय आणि संसदेची इमारत येथून काहीशे मीटर अंतरावरच आहे.
दुसरे महायुद्ध संपल्यावर 70 वर्षे उलटून गेली तरी जर्मनीमध्ये आतापर्यंत 3 हजार जिवंत बॉम्ब सापडले आहेत. मात्र त्यासाठी इतक्‍या मोठ्या संख्येने नागरिकांना स्थलांतर करायला लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)