दुसऱ्या दिवसअखेर गौरव गिल अव्वल स्थानी

मारुती सुझुकी दक्षिण डेअर रॅली

संदीप शर्मा व सुरेश राणा यांचे पुनरागमन 

पुणे: तीन वेळचा एपीआरसी चॅम्पियन गौरव गिलने आपला फॉर्म कायम ठेवताना मारुती सुझुकी दक्षिण डेअर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अव्वल स्थान मिळवले. महिंद्र ऍडव्हेंचर रेसर असलेल्या गौरवने आपला सहचालक मुसा शेरीफसह तीन विशेष स्तरासह एक सुपर विशेष स्तरात चमक दाखवली. त्याचा संघ सहकारी फिलिपोस मथाई (नेव्हिगेटर पी व्हीएस मूर्ती) याने 03:26:03 मिनिट वेळेसह दुसरे स्थान मिळवले.

महिंद्रा ऍडव्हेंचर रेसर अमित्रजित घोष (सहचालक अश्‍विन नाईक) याला सहा मिनिटांचा तोटा सहन करावा लागल्याने तिसऱ्या स्थानी राहावे लागले. युवा कुमारने बाईक विभागात दोन स्तर पूर्ण करत दुसऱ्या रेसमध्ये त्याने अव्वल स्थान मिळवले.तर, आकाश व विश्‍वास यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. टीएसडी गटात प्रमोद विग आणि प्रकाश विग यांनी अव्वल स्थान मिळवले तर, संतोष व नागराजनने दुसरे तर, श्रीकांत व रघुरमनने तिसरे स्थान पटकावले.
टीम मारुती सुझुकी मोटरस्पोर्टस संघाच्या संदीप शर्मा व सुरेश राणा यांनी पिछाडीवरून पुनरागमन करताना अनुक्रमे चौथे व सहावे स्थान मिळवले. सुझुकीच्या संदीप व त्याचा सह चालक अनमोल रामपाल यांनी तीन विशेष स्तरामध्ये 58.09 सेकंद वेळ नोंदवत पहिल्या दोन दिवसांमध्ये 03:35:05 अशा एकूण वेळेची नोंद केली. त्याचा संघसहकारी 10 वेळचा रेड दी हिमालय विजेता सुरेशा राणा (नेव्हिगेटर चिराग ठाकूर) याने जोरदार पुनरागमन करताना सहावे स्थान मिळवले.

कर्नाटकमधील देवांगेरे येथे सुरू असलेल्या या रॅलीत राणाला पहिल्या दिवशी टायर पंक्‍चर झाल्यामुळे मागे राहावे लागले होते. त्याने दिवसाची तिसरी सर्वोत्तम वेळ नोंदवली. मी रॅलीला चांगली सुरुवात केली नव्हती, पण पुनरागमन केल्याने मी आनंदी आहे. माझ्या संघाने मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे जेतेपद राखण्यासाठी मी नेहमीच माझ्यात सुधारणा करेन असे राणाने सांगितले.

सविस्तर निकाल –
कार रॅली – 1) गौरव गिल व मुसा शेरीफ (टीम महिंद्रा ऍडव्हेंचर 03:19:50) 2) फिलिपोस मथाई व पीव्हीएस मूर्ती (टीम महिंद्रा ऍडव्हेंचर 03:26:03) 3) अमित्रजित घोष व अश्‍विन नाईक (टीम महिंद्रा ऍडव्हेंचर 01:15:31.2),
बाईक रॅली – 1) युवा कुमार – (02:24:24), आकाश ऐटल- (02:32:00), विश्‍वास एस डी – (02:34:46).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)