दुसऱ्याला नेहमीच समजून घ्या…. 

…आणि या वर्षीच्या आंतरशालेय स्पर्धेत आपल्या शाळेला प्रथम क्रमांक मिळवून देणारा विद्यार्थी आहे…. समीर शिन्दे. निवेदकांचे हे शब्द ऐकले. पण समीरचा स्वत:च्या कानावर विश्‍वासच बसेना. शेजारी बसलेला राजन त्याला म्हणाला ”अरे समीर! ऊठ. जा स्टेजवर, ते बघ सर तुला खुणावत आहेत”. समीर सावध झाला. राजनने त्याची पाठ थोपटली.
स्टेजवर जाताजाता समीरच्या मनात विचार येत होते की मावळेसरांना ओळखण्यात मी केवढी चूक करत होतो. त्यादिवशी त्यांनी मी तयारी दाखवूनही मला खेळाच्या संघात घेतले नाही. उलट खेळाची संघी त्या नेहमीच्या राजनला दिली. त्याला संघनायकही बनवले.

सरांचा तर असा राग आला होता की काय सांगू. चारच दिवस मध्ये गेले आणि अचानक निरोप पाठवून मावळेसरांनी मला त्यांच्या खोलीत बोलावून घेतले. सर म्हणाले, समीर मी तुला खेळाच्या संघात घेतले नाही म्हणून काही मी तुझी संघी तुला दिली नाही असे होत नाही. मी तुझे नाव आंतरशालेय वकृत्वस्पर्धेसाठी दिले आहे. आठच दिवसांनी स्पर्धा आहे. तेव्हा स्पर्धेच्या तयारीला लाग. तू नक्कीच यश मिळवशील अशी माझी खात्री आहे. घरी जाऊन जेव्हा मी आईला ही गोष्ट सांगितली तेव्हा आईने पण समजूत काढत हेच सांगितल की “समीर! अरे, शिक्षकांना सगळे विद्यार्थी सारखेच असतात. प्रत्येकात कोणता गुण आहे, कुणाच्यात कोणती क्षमता किती आहे ते त्यांना ठाऊक असते. योग्यजागी योग्य त्या विद्यार्थ्याची ते निवड करतात आणि त्याला संधी देतात. त्यांनी तुला संधी दिलीच आहे ना? मग आता सगळा राग, गैरसमज विसर आणि मनापासून तयारी कर. त्यांची निवड खरी करून दाखव’.

त्यानंतर मी खरंच जोरदार तयारी केली. टाचणं काढली, मुद्दे तयार केले. संदर्भ शोधले, त्यांच्या वापराच्या जागा निश्‍चित केल्या, भरपूर सराव केला, मनापासून तयारी केली आणि……
“समीर शिन्दे’ .. ध्वनीप्रक्षेपकावरून पुन्हा एकदा नाव पुकारले गेले. विचाराच्या तंद्रीतून भानावर येत समीर पुढे झाला . त्याने बक्षीस स्विकारले आणि तो मागे वळला. मागेच उभ्या असणाऱ्या मावळेसरांच्या चेहऱ्यावरून समाधानाचा आनंद ओसंडून वहात होता, त्यांनी समीरला जवळ घेतले, कौतुकाने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तेव्हा चटकन त्यांच्या पायाशी झुकत समीरने मूक कबुली दिली, ‘ सर मला क्षमा करा, मी तुम्हाला समजण्यात मोठी चूक केली.”
अरुण गोखले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)