‘दुसऱ्यांची लेकरे किती दिवस गोंजाणार, स्वतःच्या घरात पाळणा कधी हलवणार’: राष्ट्रवादीची पोस्टरबाजी 

मुंबई – होळीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसेतर्फे मुंबईत ठिकठिकाणी पोस्टर लावत भाजपवर निशाणा साधला आहे. दुसऱ्यांची लेकरे किती दिवस गोंजाणार, स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

ज्यांना आम्ही नाकारले त्यांना का गोंजारता, दुसऱ्यांची लेकरे किती दिवस गोंजारणार? स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार? बुरा ना मानो होली है, अशा आशयाचे पोस्टर्स  मुंबईच्या विविध भागात लावण्यात आले आहेत.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकांआधी काँग्रेस ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप प्रावेश केला. यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही अनेक नेते, पदाधिकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर रःटरवाडी काँग्रेसने मुंबई पोस्टरबाजी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)