दुसर्‍याच्या वरातीत पिपाणी वाजविणे बंद करा ! आ.मेटेंना जयदत्त क्षीरसागर समर्थकांचा सल्ला 

बीड: गावात कधिही न येता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदार विनायक मेटे यांनी खडकीघाट येथे येवून गावाचे पुर्नवसन आपल्यामुळेच झाल्याचे जाहीरसभेत सांगून आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला आहे. दुसर्‍याच्या वरातीत पिपाणी वाजविणे बंद करा असा सल्ला खडकीघाटच्या महारूद्र रामहरी वाघ, अमोल देशमुख, नितिन गिरी, विवेक भोसले, सुरेंद्र वाघ, प्रशांत राजे भोसले या ग्रामस्थांनी दिला आहे.
जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील खडकीघाटच्या पुर्नवसनासाठी गेल्या पंधरा वर्षापासून प्रयत्न केले. गावच्या विकासासाठी देखील निधी उपलब्ध करून देत नागरी सुविधा मिळवून दिल्या. खडकीघाट हे गाव तांदळवाडीघाट याठिकाणी झालेल्या तलावामुळे बाधित झाले होते. सन 2003 जयदत्त क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा तलाव झाला तर सन 2009 साली या तलावाचे काम पुर्ण झाले तेव्हा 49 टक्के लोक गावच्या दक्षीण बाजूला राहू लागले उर्वरीत 51 टक्के लोकांच्या पुर्नवसनाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी क्षीरसागर यांनी प्रशासनाकडे आग्रही मागणी करून हा प्रश्‍न निकाली काढला.
हे करत असतांना विनायक मेटे कुठे गेले होते ? गावच्या पुर्नवसनाचा प्रश्‍न निर्माण झाला तेव्हा एकही नेता गावात आला नाही मात्र आता निवडणूका डोळ्यासमोर असतांना आ.मेटे यांनी बुधवारी गावात येवून जाहिरसभेत खडकीघाटचे पुर्नवसन आपण केल्याचे सांगून बोगस प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न केला. दुसर्‍यांच्या वरातीत आ.मेटेंनी पिपाणी वाजविणे बंद करावे असा सल्ला खडकीघाटच्या महारूद्र रामहरी वाघ. अमोल देशमुख, नितिन गिरी, विवेक भोसले, सुरेंद्र वाघ, प्रशांत राजे भोसले यासह परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)