दुष्काळ 31 ऑक्‍टोंबरपर्यंत जाहिर करू; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती 

मुंबई: राज्यात दुष्काळ परिस्थिती आहे. बहुतांशी तालुक्‍यात दुष्काळसदृश्‍य परिस्थिती असून दुष्काळ जाहिर करायचा अथवा नाही याचा निर्णय 31 ऑक्‍टोंबरपर्यंत घेतला जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात दिली. राज्यातील सुमारे 201 तालुक्‍यांचा सद्य परिस्थितीचा आढावा घेतला असता 180 तालुक्‍यांमध्ये दुष्काळसदृश्‍य परिस्थिती आहे. या संदर्भात राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. ही माहिती मिळताच त्याचे संकलन करून राज्य सरकार 31 ऑक्‍टोंबरपर्यंत दुष्काळ जाहिर करण्याचा निर्णय घेईल, असे मुख्य सरकारी वकील ऍड. अभिनंदन वग्यांनी यांनी स्पष्ट केले.
आपत्कालीन व्यवस्थापन कायदा करण्यात आला. मात्र असे असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात आणि पाणीटंचाई, दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वतंत्र जिल्हानिहाय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप संजय लाखे-पाटील यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती महेश सोनाक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्याने राज्यात दुष्काळजन्य परिस्थितीकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
राज्य सरकारकडून जोपर्यंत दुष्काळग्रस्त भागांची यादी तयार करून तशी अधिसूचना जारी करणे आवश्‍यक होते. परंतु अद्याप ही यादी तयार झालेली नाही. जोपर्यंत ही प्रक्रिया पार पडणार नाही आणि दुष्काळ जाहिर केला जात नाही, तोपर्यंत केंद्र सरकारकडून मदत मिळू शकणार नाही. यावेळी दुष्काळ जाहिर करण्याबाबत राज्य सरकार 31 ऑक्‍टोंबरपर्यंत निर्णय घेईल, अशी हमी दिली.
तर सरकारी अधिका-यांवर अवमान कारवाई 
यावेळी न्यायालयाने दुष्काळ जाहिर करणे हे न्यायालयाचे काम नाही. तो राज्य सरकारचा निर्णय आहे, असे स्पष्ट करताना वारंवार निर्देश देऊनही आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या खात्यात घोषित रक्कम जमा न झाल्याबद्दल हायकोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली. तसेच ही रक्कम जमा करण्याची जबाबदारी असलेल्या अधिका-यांची नावे सादर करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना देण्यात आलेत. वारंवार निर्देश देऊनही आदेशांची पूर्तता न करणा-या सरकारी अधिका-यांवर अवमान कारवाई करण्याचे संकेतही न्यायालयाने देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)