दुष्काळ निर्मूलनासाठी केंद्राकडे 7 हजार कोटींची मागणी : मुख्यमंत्री

प्रातिनिधिक छायाचित्र

पाहणीसाठी लवकरच केंद्राचे पथक येणार 

उस्मानाबाद: दुष्काळी मदत निधीसाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे 7 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळी तालुक्‍यांची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचे पथक येणार आहे. तसेच कृष्णा मराठवाडा प्रकल्पाकरिता राज्य सरकारने नाबार्डकडे 2 हजार 200 कोटी रूपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती त्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उस्मानाबादेत दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. दुष्काळग्रस्त भागात झालेली परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्था यावरही स्वतंत्र बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्याकरिता युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहोत. संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्याकरीता तसेच पाणीटंचाई, चाऱ्याचा प्रश्न यांसह विविध अनुदान याकरीता केंद्राकडे आपण 7 हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. आपल्या मागणीनंतर त्याची छाननी केली जाईल आणि राज्यात केंद्र सरकारच्या वतीने आपण केलेल्या तपासणीची खात्री करण्याकरिता किती पथक पाठवायचे याचा निर्णय होईल. त्यानंतर आपल्या मागणीप्रमाणे केंद्राकडून नक्की मदत मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

फडणवीस म्हणाले, दोन पावसातील कालावधी आणि पावसाचे प्रमाण याची तुलना करता पैशेवारी पन्नास टक्‍क्‍यांच्या आत आल्याने उमरगा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना विमा आणि दुष्काळी लाभ दिले जातील. ज्वारीमध्ये 50 टक्के, मका 60 टक्के, तर सोयाबीनमध्ये 60 टक्‍क्‍यांची घट आली आहे. तसेच तूर आणि कापूस पिकांमध्ये 50 टक्के घट झाली आहे. रब्बीच्या संदर्भात केवळ 25 टक्के पेरा झाला आहे. दुष्काळी उपाययोजना लागू केल्या आहेत. पाणी चारा नियोजन मोठ्या प्रमाणात करीत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पास पर्यावरण मान्यताही मिळाली आहे. आजवर या प्रकल्पाकरिता 800 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. चार वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्याकरिता सर्वतोपरी परिश्रम घेण्यात आले आहेत. निश्‍चित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण व्हावा याकरिता राज्य सरकारच्यावतीने नाबार्डकडे 2200 कोटी रूपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)