दुष्काळी स्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही-पाचपुते

महिना अखेरपर्यंत दुष्काळ जाहीर होईल
श्रीगोंदे – परतीच्या पावसाची शक्‍यता काहीच उरली नाही. यामुळे दुष्काळी परिस्थिती उदभवली आहे. या महिना अखेरपर्यंत राज्यशासन दुष्काळ जाहीर करणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, इतर मंत्र्यांशी व अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून दुष्काळी परिस्थितीत राज्यशासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
माऊली निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत पाचपुते बोलत होते. यावेळी बाळासाहेब महाडिक, संदिप नागवडे, संतोष खेतमाळीस, एम.टी.दरेकर, सतीश मखरे, राजेंद्र उकांडे आदीं उपस्थित होते. ते म्हणाले, मुंबईत एका बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांशी दुष्काळावर चर्चा झाली. दुष्काळ जाहीर करण्यास उशीर होऊ नये, ही विनंती मुख्यमंत्र्यांना केली. जनावरांना चारा छावण्या, पाण्याचे टॅंकर आदींचे नियोजन राज्य शासन करणार आहे. 2012 ची दुष्काळी परिस्थिती पालकमंत्री म्हणून योग्य रित्या हाताळली, या दुष्काळात ही आपण सहकार्य करावे, अशी विनंती रावसाहेब दानवे यांनी आपणाकडे केली.पालकमंत्री राम शिंदे सांगतील ती जबाबदारी आपण घ्यायला तयार आहोत. शेतकऱ्यांसह सर्वांनीच पाण्याचा जपून वापर करावा.
पाचपुते म्हणाले, मागील वर्षी कुकडीतील निम्मेच पाणी आपण वापरले. कुकडी प्रकल्पातील सर्व पाण्याचा हिशोब सल्लागार समितीच्या बैठकीत ठेवण्यात यावा, ही मागणी केली. त्या प्रमाणेच डिंभे ते माणिकडोह हा बोगदा तयार करावा. तरच कुकडी प्रकल्प व्यवस्थित चालेल. आपल्या या मागणीस दिलीप वळसे यांनी विरोध करीत तुम्ही पाणी जास्त नेताल असा आरोप केला. मात्र ओव्हरफ्लओचे पाणी माणिकडोहमध्ये सोडल्यास ते वापरण्यास मिळेल. जास्त पाणी नेण्याचा प्रश्‍नच नाही. या बोगद्यासाठी कुकडीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखविली असून मुख्यमंत्र्यांची यासाठी परवानगी आवश्‍यक असून ती लवकरच घेण्यात येईल. असे ही पाचपुते यांनी सांगितले.

दिवाळीपूर्वी सौर ऊर्जेच्या कामास सुरवात
राज्यातील सर्वाधिक सौर ऊर्जा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मंजूर झाले आहेत. 48 गावांचे प्रस्ताव मंजूर असून त्यातील 18 गावांतील कामांचे टेंडरिंग देखील झाले आहे. येणाऱ्या दिवाळीपूर्वी या कामास प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात येईल. यामध्ये लिंपणगाव, कोळगाव, शेडगाव, कौठा, विसापूर, पारगाव, चिखली या महत्वाच्या गावांसहित 18 गावात हे काम सुरू होईल, असे पाचपुते म्हणाले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)