दुष्काळी पट्ट्यातील ऊस तोडणी लवकर करा

शेतकऱ्यांनी केली सोमेश्‍वर कारखान्याकडे मागणी

जवळार्जून- पुरंदर तालुक्‍याच्या दुष्काळी पट्ट्यातील ऊस लवकरात लवकर तोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाकडे केली आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अंतर्गत जेजुरी गटातील नाझरे कडेपठार, नाझरे सुपे, जवळार्जून, कोथळे, वाळुंज, मावडी पिंपरी या भागातील शेतकऱ्यांचे ऊस पाण्यावाचून जळून चालले आहेत. त्यामुळे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने जेजुरी गटांमध्ये 2 हार्वेस्टर त्याचबरोबर 48 ऊस तोड कामगार यांच्या मदतीने दररोज 850 टन ऊस तोडण्याचे काम सुरू आहे.
जेजुरी गटात एकूण 3200 एकर ऊस नोंदणी आहे. त्यापैकी आजपर्यंत 400 एकर ऊस तोडणी झाले असून अजूनही 2800 एकर ऊस तोडण्याची बाकी आहे. सध्या पाण्याच्या कमतरतेमुळे लवकरात लवकर ऊस कारखान्यात घेऊन जाण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. साधारपणे 1 लाख 30 हजार टन ऊस उत्पादनापैकी आजपर्यंत 30 ते 32 हजार टन ऊस तोडणी झाली आहे. अजून एक लाख टन ऊस तोडणी बाकी आहे. एक हर्वेस्टर दररोज साधारणपणे 180 टनापर्यंत ऊस तोडणी करतो. त्याचबरोबर तीन एकर उसाची तोडणी होते. ऊसतोड कामगार टोळी 15 ते 20 टन तोडणी करतात. त्यामुळे जेजुरी गटातील ऊसाची तोडणी करायची म्हटले तर अजून चार महिने लागतील. त्यामुळे जास्तीत जास्त हार्वेस्टर, ऊस तोड कामगार टोळ्या देण्याची मागणी शेतकऱ्यांनी कारखान्याकडे केली आहे. याबाबत कारखान्याचे फिल्ड ऑफिसर विठ्ठल नाझीरकर यांनी ऊस तोडणीसाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.

  • 15 जानेवारीनंतर दीड हजार टन उसाची तोडणी केली जाईल. त्याचबरोबर एक फेब्रुवारीपासून दररोज दोन हजार टन उसाची तोड केली जाईल. इतर गटातील 12 ऊस तोड कामगार टोळ्या आणि दोन हार्वेस्टरची मागणी कारखान्याकडे केले आहे. एक फेब्रुवारीपासून सर्व उपलब्ध होईल.
    महेश राणे
    संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)