दुष्काळी जिल्ह्यांतील लाभर्थींना पुण्यातही स्वस्त धान्य

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर स्थलांतरितांची संख्या वाढणार


स्वस्त धान्य दुकानदारांना 10 टक्‍के जादा कोटा देणार

पुणे – राज्यातील 151 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबरपासून सोलापूर, बीड, उस्मानाबाद, परभणी, औरंगाबाद आदी भागांतून काही कुटुंबे ही पुण्यात स्थलांतरीत होण्याची शक्‍यता आहे. अशा कुटुंबांनाही पुण्यात स्वस्त धान्य मिळावे, यासाठी प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारांकडे नेहमीपेक्षा 10 टक्के जास्त धान्य दिले जाणार आहे. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांनाही शहरात शिधापत्रिकेवर धान्य, साखर आणि डाळी मिळू शकणार आहेत, असे अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे सांगितले.

दुष्काळाची तीव्रता पाहता महिन्याभरातच राज्यातील विविध भागांतून पुण्यात नागरिक स्थलांतरीत होण्याची शक्‍यता आहे. याबाबत मोरे म्हणाल्या, स्थलांतरित होणारी कुटुंबे ही अन्य जिल्ह्यांतील असली, तरी त्यांना पुण्यातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य, साखर, तूरडाळ, उडीद डाळ आणि हरभरा डाळ मिळू शकणार आहे. त्यासाठी दुकानदारांकडे नेहमीपेक्षा सुमारे 10 टक्के जास्त धान्य देण्यात येणार आहे.

सध्या शिधापत्रिकाधारकाला कोणत्याही स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेता येते. मात्र, दर महिन्याच्या 7 ते 15 तारखेदरम्यान संबंधित दुकानदारांकडे नोंद असलेल्या शिधापत्रिकांना धान्य देण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानंतर अन्य भागातील नागरिकांना धान्य देण्यात येते. दुष्काळाच्या काळात अन्य भागांतून स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांनी शिधापत्रिका दाखविल्यास त्यांना धान्य वाटप केले जाणार आहे, असे मोरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, स्वस्त धान्य दुकानांमध्ये तूरडाळ, हरभरा डाळ आणि उडीदडाळ देण्यात येते. आता मूगडाळही मिळणार आहे. तूरडाळ ही शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांनाही स्वस्त धान्य दुकानांमधून घेता येते. मात्र, हरभरडाळ आणि उडीदडाळ ही शिधापत्रिकाधारकांनाच वितरित केली जाते. या महिन्यात या डाळी शहरात उपलब्ध होणार आहेत. लवकरच मूगडाळही मिळू शकणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)