दुष्काळी गावांसाठी त्वरीत उपाययोजना करा

रमेश थोरात ः दौंड तालुक्‍यातील स्थितीसाठी जिल्हधिकाऱ्यांना निवेदन

केडगाव- दौंड तालुक्‍यातील दुष्काळी गावांतील परस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, या मागणीसाठी दौंड तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पंचायत समितीचे सदस्य नितीन दोरगे यांनी सांगितले की, चालू वर्षी पाऊस समाधानकारक न झाल्याने दुष्काळी स्थिती आहे, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी नुकताच तालुक्‍यातील दुष्काळी गावांचा दौरा केला, त्यामध्ये शेतकरी आणि नागरिकांना सध्या भयंकर स्थितीला सामोरे जाण्याची शक्‍यता निर्माण झाली असून शासनाने तातडीने पावले उचलून या समस्येची गंभीर दखल घ्यावी यासाठी माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आवश्‍यक त्या गावांच्यासाठी टॅंकर, चारा डेपो, पुरंदर आणि जानाई उपसा योजनेचे पाणी देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, महिला व बालकल्याणच्या सभापती राणी शेळके, दूध संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ टुले, बाजार समितीचे माजी सभापती रामभाऊ चौधरी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)