दुष्काळामुळे डांळिब शेतकरी अडचणीत

विडणी – फलटण तालुक्‍यातील झिरपवाडी, सासकल, निरगुडी, गिरवी, बोडकेवाडी, धुमाळवाडी येथील शेतकऱ्यांनी आपला कल डाळिंब उत्पादनाकडे वळवला. पण पाणी व तेल्या रोगाच्या संकटामुळे पिक क्षेत्र कमी होत आहे. डाळिंब छाटणीवर मोठ्या प्रमाणावर मजूरांना रोजगार मिळत नाही.

डाळिंब बागेच्या लागवडीचा खर्च अधिक असला, तरी ठोक उत्पन्न देणारे हे पीक असल्याने गेल्या एका वर्षांमध्ये डाळिंब लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला आहे. मात्र, निसर्गाची अवकृपा होत राहिल्याने डाळिंब बागायतदारांपुढे पाण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सुरूवातीच्या लागवडीपासून ते फळे लागेपर्यंत एकरी लाखोपर्यंत खर्च येणाऱ्या या पिकावर दुष्काळामुळे संकट कोसळले आहे.

-Ads-

काही शेतकऱ्यांच्या बागांना गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात पाणी न मिळण्यामुळे त्या डाळिंबबागांची यंदाच्या हंगामात फळधारणा झाली नाही. काही शेतकऱ्यांच्या बागांना यंदाच्या हंगामात प्रारंभी फळे लागले. मात्र, ऐन वाढीच्या अवस्थेतच पाणी न मिळाल्याने डाळिंबाचे फळे अक्षरश: सुकून गेले. तशातच या पुढील काळात या डाळिंबबागा कशा जगवायच्या या चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांपुढे त्यांना कुऱ्हाड लावणे हाच अंतिम पर्याय डोळ्यासमोर दिसत आहे.

विकास सेवा सोसायटी, जिल्हा बॅंक, नातेवाईकांकडून हातउसने पैसे घेऊन शेतकऱ्यांनी डाळिंबबागांची जपणूक केली आहे. त्यातच यूरिया वगळता इतर रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. डाळिंब पिकांमुळे औषध दुकानादार, डाळिंब छाटणी कामगार, खुरपणीसाठी माहिला व अन्य कामासाठी मजूरांची पोटची आथिर्क भूक भागत होती. पण पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी व मजूर अडचणीत सापडले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
5 :blush: Great
30 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)