दुष्काळामुळे जगासमोर नवे संकट – संयुक्त राष्ट्र

रोम : जगासमोर वाढती उपासमारी आणि दुष्काळामुळे नवे संकट निर्माण झाल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राने एका अहवालाद्वारे दिला आहे. या अहवालानुसार 2017 मध्ये 51 देशांचे 12.4 कोटी नागरिक उपासमारी आणि दुष्काळाचे पीडित ठरले. 2016 च्या तुलनेत हा आकडा 1.10 कोटीने अधिक आहे.

उपासमारीचे सर्वात मोठे कारण येमेन, म्यानमार, उत्तरपूर्व नायजेरिया, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि दक्षिण सूदान या देशांमधील हिंसाचार आहे. उपासमारीचे संकट समाप्त करायचे असल्यास भूक आणि हिंसाचारातील संबंध आम्हाला स्वीकारावे लागतील असे विधान संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी शाखेचे महासंचालक जोस ग्रेसियानो यांनी केले.

हिंसाचारग्रस्त क्षेत्रांमध्ये अन्नसुरक्षा आणि उपजीविका सुनिश्चित केल्यास जीवन वाचविण्यासोबत शांतता प्रस्थापित करण्यास मदत मिळू शकते असे अहवालात नमूद करण्यात आले. या अहवालातून अत्यंत महत्त्वाची माहिती आम्हाला मिळाली असून याच्या विश्लेषणातून आम्ही आव्हानांना अधिक चांगल्याप्रकारे तोंड देऊ शकतो. लोक प्रतिदिन उपासमारीला तोंड देत असल्याचे संयुक्त राष्ट्र महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस यांनी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)