दुष्काळाबाबत झोपलेल्या सरकारला जागे करा

मंचर-दुष्काळी परिस्थिती असताना झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होवून सरकारला जाब विचारला पाहिजे. प्रसंगी आंदोलन करुन शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष, आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले. मंचर (ता. आंबेगाव) येथे आंबेगाव – शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसची आढावा बैठक नुकतीच पार पडली. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वळसे पाटील बोलत होते.
यावेळी आंबेगाव- शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, भीमाशंकरचे संचालक ऍड प्रदीप वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, सुनिता गावडे, डॉ. वर्षा शिवले, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, माजी सभापती सुभाष उमाप, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, राजेंद्र गावडे, दत्तात्रेय कदम, बाळासाहेब भोर याच्यांसह 39 गावांतील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी वळसे पाटील यांनी पक्ष संघटना व बूथ कमिट्यांचा आढावा घेत सर्वांना सामावून घेत पक्ष कार्यकारिणी जाहिर करण्याची सूचना अध्यक्ष पाचुंदकर यांना दिल्या.दुष्काळात पक्ष कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्यावर भर द्यावा, अनावश्‍यक खर्च टाळून तो दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी,जनावरांना चारा यासाठी खर्च करा, असेही बैठकीत वळसे पाटील यांनी सांगितले.
यावेळी पाचुंदकर यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबरोबरच पक्षातील प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना पक्ष कार्यकारिणीत सामावून घेत, सर्वांशी सविस्तर चर्चा करुन येत्या आठ दिवसांत पक्ष कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असताना पाचुंदकर यांनी अल्पावधीतच मोठ्या उत्साहाने उल्लेखनीय काम केल्यानेच त्याची पावती म्हणून पक्ष नेतृत्वाने त्यांना पक्षाचे आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याने व पक्षाला त्यांच्यारुपाने पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाल्याने शिरुर तालुक्‍यातील 39 गावांमधील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असल्याचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी बैठकीत सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)