दुष्काळाने ज्वारीसह गव्हालाही मोठा फटका

File photo

फक्‍त 25 टक्के क्षेत्रावर पेरण्या : पावसाने दगा दिल्याने नुकसान

पुणे – दुष्काळाची तीव्रता वाढल्याने रब्बी हंगामातील हक्काचे पीक समजल्या जाणाऱ्या ज्वारीचे क्षेत्र यंदा घटण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. आत्तापर्यत राज्यात फक्त 25 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

रब्बी हंगामात ज्वारी आणि हरभरा हे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. पण, यंदा या दोन्ही हमखास पिकांना फटका बसण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे राज्यात जाणविणारी पाणी टंचाई. ज्वारीचे क्षेत्र हे मराठवाड्यात जास्त आहे याच भागात यंदा पावसाने दगा दिला आहे. त्याचा फटका ज्वारीला बसला आहे.

राज्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र हे 26 लाख 79 हजार 728 हेक्‍टर इतके आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये सुमारे 14 लाख 34 हजार 572 हेक्‍टर क्षेत्रावर ज्वारीच्या पेरण्या झाल्या होत्या. पण, यंदा मात्र आत्तापर्यंत जेमतेम 6 लाख 76 हजार 505 हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.राज्यात असणारी पाण्याची कमतरता हेच एकमेव कारण असल्याचे कृषी अधिकारी सांगतात. प्रत्यक्षात ज्वारीचे क्षेत्र वाढले पाहिजे कारण त्यामुळे चारा सुद्धा उपलब्ध होणार आहे. दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी चारा म्हणून सुद्धा चाऱ्याचा उपयोग होऊ शकतो, असे अधिकारी सांगत आहेत.

ज्वारीप्रमाणे गव्हाचीसुद्धा अशीच स्थिती आहे. गव्हाचे राज्यातील क्षेत्र साधारणत: दहा लाख हेक्‍टरच्या आसपास आहे. यंदा आत्तापर्यंत फक्त सव्वा लाख हेक्‍टरच्या आसपास पेरण्या झाल्या आहेत. हे सरासरीमध्ये हे प्रमाण फक्त 13 टक्के आहे. गव्हाचे क्षेत्र आगामी काळात वाढू शकते. कारण गव्हाच्या पेरण्या डिसेंबर मध्ये होत असतात. कारण, गव्हाला थंडी आवश्‍यक असते. सध्या राज्यात थंडी अद्याप फारशी सुरू झाली नसल्याने गव्हाचे क्षेत्र आगामी काळात वाढू शकेल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)