दुष्काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे : आ. थोरात

नगर: यंदा दुष्काळामुळे पाणी व चारा कसा पुरविणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जनावरांना वाचविण्यासाठी छावण्या उभ्या कराव्यात. दावणीला चारा देण्याची मागणी होतेय. मात्र दावणीला चारा देणं सोप नाही. छावण्यांमध्ये व्यवस्था करावी लागेल. यावर्षी जास्त जनावरे असून, या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं, अशी मागणी माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपाल पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून आ.थोरात बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने आदी प्रमुख उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ना. विखे म्हणाले की, दुष्काळाची दाहकता प्रचंड आहे, शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीला अटी घातल्याने माफी मिळू शकत नाही. अवर्षण प्रवण असतांना कशाप्रकारे शेती करता येईल हे पाहावे लागेल. कृषी विद्यापीठाचा शेतकऱ्यांशी संपर्क येत नाही. तुमचे संशोधन व्यवस्थित चालले असले तरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठात भाषण द्यायला सांगा असे कृषिमंत्री असतांना मी सांगितलं होत. शेतकऱ्यांची भाषण शास्त्रज्ञांसमोर ठेवा. विद्यापीठाच्या आजूबाजूच्या गावात विद्यापीठाला काही करता आले नाही. सरकार येतात आणि जातात पण व्यवस्थेतील दोष दूर करणे आवश्‍यक आहे.

शालिनी विखे म्हणाल्या, ना. शिंदेंकडे जलसंधारण खाते असल्यामुळे कृषी खात्याला सलाईन देण्याची गरज आहे. कृषीसाठी निधी कमी आहे. लाळ्या खुरकूत लस नसल्याने जनावरं दगावले. पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची अडचण निर्माण झाली आहे. पूर्वी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यावर पाठविले होत. त्याचप्रमाणे आता या शेतकऱ्यांनाही जिल्हा नियोजनमधून अभ्यास दौऱ्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी देण्याचीही मागणी त्यांनी केली.त्या मागणीला ना. शिंदे यांनी होकार दर्शविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)