दुष्काळाच्या जखमेवर दिलाशाची फुंकर

यंदा “एल-निनो’चा अडथळा नाही : अधिकाऱ्यांचा दावा

पुणे – “येत्या पावसाळ्यात प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह (एल-निनो) हा अडथळा राहणार नाही,’ अशी दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा देणारी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी येथे दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वर्षी राज्यात पावसाने ओढ दिली. त्यामुळे डिसेंबरअखेरपासूनच राज्याच्या वेगवेगळ्या भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, “आतापर्यंत “एल-निनो’ विकसित झालेला नाही. त्यामुळे येत्या पावसाळ्यामध्ये “एल-निनो’ हा अडथळा असणार नाही. याच्या प्रगतीवर आम्ही बारकाईने नजर ठेवून आहोत. त्यामुळे त्याचा विकास कसा होतोय, यावर आमचे लक्ष आहे.’
या वर्षी थंडीचा कडाका वाढला आहे, याबद्दल डॉ. राजीवन म्हणाले, “या वर्षी संपूर्ण जगात थंडीची तीव्रता वाढली आहे. पृथ्वीच्या ध्रुवांवरही मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे. भारतात हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हिमवृष्टी होत आहे. तसेच, युरोपमध्येही यंदा बर्फ पडण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतात “वेस्टर्न डिस्टर्बन्स’ प्रमाणही या वर्षी वाढले आहे. पण, यातून भारतातील सपाट मैदानात पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली या प्रदेशात तेथील सरासरीच्या तुलनेत आत्ता कमी प्रमाणात पाऊस नोंदला गेला आहे. पण, त्या जम्मू आणि काश्‍मीर, हिमाचल प्रदेश या भागात हिमवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा हिमवृष्टी जास्त होत आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)