दुष्काळाची झळ अधिकाऱ्यांना कशी समजणार?

दुष्काळ पाहणी पथकावर  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टीकास्त्र

पुणे – “वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून राज्यातील कष्टकरी, शेतकऱ्यांना बसणाऱ्या दुष्काळाची झळ अधिकाऱ्यांना काय समजणार,’ अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय समितीवर टीकास्त्र सोडले.

“पाण्याअभावी पिके जळत आहेत. त्याबाबत शेतकरी अधिकाऱ्यांसमोर आपल्या व्यथा मांडत असताना, जिथे कुसळही उगवत नाहीत तिथे “तुम्ही चारा पेरा’ असे अधिकारी सांगतात,’ असे पवार यांनी त्यांच्या शैलीत सांगत अधिकाऱ्यांची “पोलखोल’ केली.

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात येणारे कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्कार, कृषिनिष्ठ शरद आदर्श कृषिग्राम आणि आदर्श गोपालक पुरस्कार पवार यांच्या हस्ते देण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, कृषिसभापती सुजाता पवार, प्रवीण माने, राणी शेळके, सुरेखा चौरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नरसिंह मित्रगोत्री उपस्थित होते.

“शेतकरी जगला, तरच शहरातील लोकांना अन्नधान्य, फळे भाजीपाला उपलब्ध होईल, याची जाणीव शासनाला नाही. केंद्राकडे कांद्यासाठी अनुदान मागणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यावर पवार यांनी समाचार घेत कधी अनुदान मागता, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यावर? राज्यात दुष्काळाची भीषण पार्श्वभूमी असताना सरकार मात्र निर्णय घेत नाही. पदाधिकाऱ्यांनी जिल्हाभर दौरे करा, टॅंकरसाठी पाठपुरावा करा,’ अशा सल्ला पवार यांनी दिला.
प्रास्ताविक सुजाता पवार यांनी केले. आशिष जराड यांनी सुत्रसंचालन तर आभार डॉ. एसबी विधाटे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)