‘दुष्काळसदृश’ आणि भाजप सरकार ‘अदृश्य’ ; शिवसेनेचे टीकास्त्र

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई: दुष्काळाचा राक्षस महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी टपला आहे. निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला दुष्काळाच्या वणव्याने आपल्या मगरमिठीत घेतले आहे. दुष्काळाच्या संकटाने अर्ध्या राज्याचे वाळवंट केले आहे. पिण्याच्या पाण्याचा, अन्नधान्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण आणि भेसूर होत असताना सरकार काय करते आहे ? असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थीत केला आहे.

खरिपाची सगळी पिके गेली आणि रब्बीचीही पिके आता दुष्काळामुळे घेता येणार नाहीत. शेतजमिनींचे हे वाळवंट उघड्या डोळ्यांनी धडधडीत दिसत असताना ‘दुष्काळसदृश’ आणि सरकार ‘अदृश्य’ असा खेळ का मांडला जात आहे? अशी टीका देखील शिवसेनेनं भाजपवर केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेना सरकारमध्ये जरूर आहे, पण जनतेच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या अडीअडचणींच्या विषयांवर सरकारला जाब विचारण्यासाठी शिवसेनेशिवाय दुसरे कोण पुढे असते? असा सवाल शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)