दुष्काळमुक्‍तीसाठी 45 दिवसांची निकराची झुंज

रेडा- “सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेसाठी पासून इंदापूर तालुका जलसंधारणाच्या कामासाठी स्पर्धेत निवडला गेला. यावर्षी 8 एप्रिल रोजी या
स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या मिनिटा पासून “टिकाव खोरी’ यांच्या विधिवत पूजनाने गावा-गावातील जलश्रमिकांनी गावाच्या शाश्‍वत पाण्यासाठी एक होऊन दुष्काळा विरुद्ध गेले 45 दिवस निकराची झुंज दिली. मंगळवारी (दि. 22) रात्री 12 वाजता सतत खण-खणणारी ही हत्यारे खाली ठेवली. यात काही गावांनी 100 गुणांच्या या स्पर्धेत 87 गुणांपर्यंत मुसंडी मारली, उरलेले 13 गुण पाणी फाउंडेशनची “जज टीम’ उपचारांची गुणवत्ता व भविष्यासाठी गावाने केलेले पाण्याचे नियोजन यातून देणार आहेत.
इंदापूर तालुक्‍यातील सहभागी 37 गावांपैकी 20 गावांनी श्रमदान व मशीन कामे करून प्रचंड मोठी जलसंधारण क्षमता निर्माण केली आहे. यासाठी गावांना सर्वांत मोठी साथ मिळाली ती भारतीय जैन संघटनेची संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी गतवर्षी प्रमाणे यावर्षीही स्पर्धेच्या कालावधीत पूर्णतः मोफत पोकलेन व जेसीबी मशीन उपलब्ध करून दिल्या, याचा लाभ घेत 16 गावांनी दिवस-रात्र 22-22 तास सतत काम करून एकूण 6500 तास मशीन काम पूर्ण केले. यात “माथा ते पायथा’ असे उपचार प्राधान्याने करून अंदाजे सहा ते सात लाख घनमीटर पेक्षा अधिक एवढी मोठी पाणी साठवण क्षमता निर्माण केलेली आहे.
समाज एक होऊन काम करीत असेल तर लोकप्रतिनिधी, शासन प्रशासनातील अधिकारी कर्मचारी ही अतिशय खंबीरपणे पाठीशी उभे राहून नागरिकांना येणाऱ्या समस्येचे निराकरण तातडीने करत असतात याचे प्रत्यंतर या स्पर्धेच्या काळात नागरिकांना प्रकर्षाने जाणवले, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी स्पर्धेत सहभागी प्रत्येक गावांना डिझेलसाठी घोषित केलेले दीड लाख रुपये तातडीने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

  •  त्यांनी केले ग्रावकऱ्यांच्या खांदाला खांदा लावून काम
    या वर्षीच्या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल ते पाणी फाउंडेशनकडे स्वेच्छेने श्रमदानासाठी नाव नोंदणी करून महाश्रमदानात प्रत्यक्ष श्रमदान केलेल्या शहरवासीयांचे, त्याचप्रमाणे इंदापूर येथील डॉक्‍टर्स, व्यावसायिक, वकील संघटना, बारामती ऍग्रीकल्चर ट्रस्टचे विद्यार्थी, सांप्रदायिक मंडळ, बारामती, भिगवण येथील कंपन्या मधील कामगार, अधिकारी स्वतः मालक यांनी गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून केलेले श्रमदान.
  • आता निकालाकडे लक्ष…
    पाणी फाउंडेशनचे कृष्णा शिंदे व आण्णा ढाल्पे या तालुका “समनवयकांची’ भूमिकाही या स्पर्धेत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली, त्यामुळेच इंदापूर तालुक्‍यातील घोरपडवाडी, सराफवाडी, काटी, लांमजेवाडी, थोरातवाडी, झगडेवाडी, रंणगाव या आघाडीच्या गावात खरी चुरस निर्माण होईल, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत असून आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते ऑगस्ट महिन्यात घोषित होणाऱ्या निकालाकडे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)