दुष्काळप्रश्‍नी शेतकऱ्यांनी अडवली पालकमंत्र्यांची गाडी

बोंडअळीची नुकसान भरपाई व नळ योजना कार्यान्वित करण्याची मागणी
शेवगाव  – जिल्ह्याच्या टंचाई दौऱ्यावर असलेले पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांची शेवगाव दौऱ्यात गाडी अडविण्यात आली. तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याचे, शेतकऱ्यांना बोंडअळीची नुकसान भरपाई तसेच हातगावसह 28 गावे प्रादेशिक नळ योजना कार्यान्वित करण्याच्या मागणीकडे लक्षवेधण्यासाठी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडविली.
जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांच्यासह शेतकऱ्यांनी या मागणीचे निवेदन ना. शिंदे यांना दिले.यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे उपाध्यक्ष संजय अंधाळे, जगन्नाथ गावडे, नामदेव कसाळ, जगन्नाथ गरड, दत्तू जाधव, पांडुरंग जाधव, अक्षय गरड, किसनराव पोकळे, जिजाबाई जाधव, छाया त्रिंबके, मंदाबाई लोहकरे, नवनाथ पोपळे, अंतरवाली बुद्रुक, सविता आठरे, प्रयागा पवार, इंदुबाई आठरे, गुणाजी कापसे, शिवराम लोहकरे, रामकिसन सांगळे, गुणाजी कापसे, गौतम सुरवसे, हरी फाटे, अशोक पातकळ, अनिता जाधव, सविता आठरे, छाया त्रिंबके आदींसह शेवगाव तालुक्‍यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवगाव तालुक्‍यात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर झाला आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आधार देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या दावनीला चारा व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. मागील वर्षी कपाशी या पिकावर बोंड अळी या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे कपाशीचे पिंक संपुष्टात आले. शासनाने त्या मोबदल्यात नुकसान भरपाईपोटी प्रति हेक्‍टरी 6 हजार 800 रुपये अनुदान दिले. परंतु शेवगाव तालुक्‍यातील गोळेगाव, गायकवाड जळगाव, नगलवाडी, अंतरवाली खुर्द, सुकळी, शेकटे खुर्द आदी इतर गावांना हे अनुदान प्राप्त झाले नाही. ते अनुदान आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. चालू वर्षी भरलेला पिक विमा व दुष्काळजन्य परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पीक विम्याचा निकष न लावता त्यांना पंचनामे करुन सरसकट प्रति हेक्‍टरी 30,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी. हातगावसह 28 गावे पाणी पुरवठा योजना शासनाने मंजूर केली आहे. दुष्काळी भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न सोडविण्यासाठी ही अपूर्ण अवस्थेत असलेली ही योजना कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रश्‍न मार्गी न लावल्यास शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)