दुष्काळजन्य स्थिती सुधारा

इंदापुरात कॉंग्रेसचे तहसीलदारांना निवेदन

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या विविध मागण्यांबाबत व केंद्र शासनाच्या राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशी करा, यासह अन्य मागण्याचे निवेदन इंदापूर तालुका कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दिले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.14) रोजी याबाबत मागणी केली. इंदापूर तालुक्‍यामध्ये यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने.दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील बऱ्याच गावांमध्ये नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाण्यांपासून वंचित रहावे लागत आहे. तालुका पंचायत समितीने झगडेवाडी, वकिलवस्ती,व्याहाळी, म्हसोबाचीवाडी गावांकरिता शासनाकडे टॅंकरची मागणी केलेली आहे. तसेच सध्या नीरा डाव्या कालव्याचे पाणी सुरू आहे. या कालव्यांतर्गत शेटफळ हवेली,वडापुरी, वरकुटे खुर्द, निरवांगी, सराफवाडी, अंथुर्णे येथील मोठे साठवण तलाव येतात. यापैकी शेटफळ हवेली व वरकुटे खुर्द तलावात पाणी सोडलेले आहे. तरी राहिलेले तलावही पाण्याने भरणे आवश्‍यक आहे. यासाठी पाणी सोडासे, अशी मागणी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
खडकवासला कालव्याचेही पाणी सुरू होणार आहे. या कालव्यांतर्गत 12 साठवण तलाव येतात. या तलावात पाणी सोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नागरिक व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे हे तलाव खडकवासलातून भरण्यात यावेत, अशी मागणी कॉंग्रेसने केली. चारा छावणी तत्काळ सुरू करण्यात यावी, यासह तालुक्‍यातील प्रमुख नऊ मागण्यांचे निवेदन तहसीलदार मेटकरी यांना देण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, इंदापूर तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, अर्बन बॅंकेचे चेअरमन भरत शहा, दूध संघाचे चेअरमन मंगेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती देवराज जाधव, कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बापूसाहेब जामदार आदी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)