दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हरभरा देणार दिलासा

पुरेशा उत्पादनाची अपेक्षा : 81 टक्‍के क्षेत्रावर पेरणी

पुणे – ज्वारीच्या पेरण्या यंदा कमी झाल्या असल्या, तरी हरभऱ्याच्या उत्पादनात मात्र यंदा वाढ होणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बळीराजाला काही अंशी दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा राज्यात साधारणपणे 81 टक्‍के क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली आहे.

यंदा मराठवाड्यात असणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीच्या पेरण्या घटल्या आहेत. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन कमी होणार आहे. रब्बीच्या हंगामात ज्वारी आणि हरभरा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात, पण यंदा राज्यात ज्वारीच्या पेरण्या घटल्या असताना दुसरीकडे हरभऱ्यांच्या पेरण्या मात्र वाढल्या आहेत.

राज्यात हरभऱ्यांचे सरासरी क्षेत्र हे 14 लाख 90 हजार 525 हेक्‍टर इतके आहे. यंदा 12 लाख 10 हजार 453 हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. हे प्रमाण सरासरीच्या 81 टक्के इतके आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी 18 लाख 47 हजार 662 हेक्‍टर क्षेत्रावर हरभऱ्याच्या पेरण्या झाल्या होत्या. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने सर्वत्र पाणीसाठा मुबलक होता. त्यामुळेच हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झाली होती. यंदा दुष्काळी परिस्थिती असूनही हरभऱ्याचे पीक वाढणार आहे. त्याचबरोबर इतर कडधान्यांची लागवड 92 टक्के भागात झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)