दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाले मोफत एस. टी. बसपास

सरकारच्या निर्णयाचे विद्यार्थ्यांने केले स्वागत

सासवड- दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. दुष्काळ सदृश्‍य म्हणून जाहीर केलेल्या तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सवलत पास देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. त्यानुसार सासवड एस. टी. प्रशासनाच्या वतीने यावर अंमलबजावणी करण्यात येत आहे. सरकारच्या निर्णयाचे विद्यार्थ्यांने स्वागत केले आहे.
दिवाळीच्या सुट्टीनंतर पुरंदर तालुक्‍यातील शाळा, महाविद्यालय सुरु झाली आहेत. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील दुष्काळ सदृश्‍य 180 तालुक्‍यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला. 15 नोव्हेंबरपासून अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक एस. टी. महामंडळ प्रशासनाकडून काढण्यात आले होते.
शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार शैक्षणिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण घेणारे उच्च माध्यमिक व महविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येत असलेली 33.33 टक्‍के रक्‍कम 2018- 19च्या उर्वरित सत्राकरिता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अखेर वसूल करण्यात येऊ नये. एसटी बसचे पास 100 टक्‍के सवलतीत मिळणार असून सदरची सवलत केवळ पास नुतनीकरण करणारे विद्यर्थ्यां करीताच असणार आहे. नव्याने पास घेणारे विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क आकारले जाणार आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींसाठी असणारे मोफत पास आता बारावीपर्यंत होणार असून ही योजना शहरी बससेवेसाठी नाही.
मनिषा इनामके, प्रभारी आगार व्यवस्थापक सासवड बस डेपो
बॉक्‍स

  • सर्व विद्यार्थ्यांना पास द्यावे
    या सवलतीचा लाभ जुन्या पासधारक विद्यार्थ्यांनाच होणार असून नवीन पास काढणारे विद्यार्थी सवलतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. तालुक्‍यात दुष्काळ सदृश्‍य परिस्थिती असल्यामुळे दुजाभाव न करता सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास मिळावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष प्रशांत वांढेकर, राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष शिवाजी पोमण, सासवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गिरमे, नवनाथ बोरावके, शिवाजी साळुंखे यांनी दिला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)