दुष्काळग्रस्त भागात एसटी प्रवास मोफत

दिवाकर रावतेंची घोषणा ः 7 लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

मुंबई –
पूर्वी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या 151 तालुक्‍यांबरोबरच आता राज्यात नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या 76 तालुक्‍यातील महसुली मंडळामधील विद्यार्थ्यांनाही उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी एसटी महामंडळाचा सवलत पास मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केली. 1 जानेवारीपासून मोफत पास सवलत योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थीतीमुळे शेतकरी तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थ अडचणीत आले आहेत. याशिवाय शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एसटीचे बहुतांश प्रवासी असल्याने एकप्रकारे ते एसटीचे अन्नदाते आहेत. त्यांना अडचणीच्या काळात मदत करणे हे एसटीचेही कर्तव्य असल्याचे मानून त्यांच्या शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार उर्वरीत शैक्षणिक वर्षांसाठी विद्यार्थी मासिक पाससाठी 100 टक्के सवलत देण्यात येत असल्याचे रावते यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पाससाठी सध्या 66.67 टक्के इतकी सवलत देण्यात येते. शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी ही सवलत 100 टक्के इतकी देण्यात येत आहे. आता या योजनेत नवीन दुष्काळग्रस्त महसुली मंडळांचाही समावेश करण्यात आला आहे.

महामंडळावर 123 कोटींचा बोजा
ही सवलत एसटी महामंडळामार्फत देण्यात येत असून त्यासाठी महामंडळावर साधारण 123 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राज्यातील साधारण 35 लाख विद्यार्थ्यांना यासवलत योजनेचा सध्या लाभ मिळत आहे. आता नवीन महसुली मंडळातील अतिरिक्त 7 लाख 3 हजार विद्यार्थ्यांनाही या सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे, असे परिवहन मंत्री रावते यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)