दुष्काळग्रस्तांसाठी प्राथमिक शिक्षकांचा मदतीचा हात

शिरूर तालुक्‍यात दिल्या 25 पाण्याच्या टाक्‍या

टाकळी हाजी-शिरूर तालुक्‍यातील पाणी टंचाईने तहानलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षक एकवटले असून त्यांनी 25 पाण्याच्या टाक्‍या साठवणीसाठी देऊन हातभार लावला आहे.
शिरूर तालुक्‍यातील केंदूर, पाबळ, मिडगुलवाडी, धामारी, खेरेवाडी, खैरेनगर, या गावांमध्ये सध्या तीव्र पाण्याची टंचाई भासत असून, शासनाच्या वतीने 18 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणी साठविण्यासाठी टाक्‍यांची आवश्‍यकता होती. गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव वाळके, पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल पलांडे, शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष माऊली पुंडे, शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण, पदवीधर संघटनेचे तालुका अध्यक्ष शहाजी पवार, संघाचे तालुका अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, समितीचे तालुका अध्यक्ष सतिश नागवडे, अखिल शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष रमेश थोरात, केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र टिळेकर, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सतिश पाचरणे, यांच्यासह शिक्षकांनी प्लॅस्टीक टाक्‍या घेऊन देण्याचा निर्धार केला. त्यांनी सर्व शिक्षकांनी लोकवर्गणी गोळा करून टाक्‍या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्याकडे सुपूर्द केल्या. या वेळी सहायक गटविकास अधिकारी अशोक बांगर, शिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, बी. आर. गायकवाड, संजय शिंदे, केंद्रप्रमुख महादेव बाजारे उपस्थित होते.
फाकटे येथे झालेल्या केंद्र स्तरीय परिषेदमध्ये सभापती विश्वास कोहकडे व केंद्रप्रमुख महादेव बाजारे यांनी पाण्याच्या टाकीविषयी शिक्षकांना आवाहन केले. त्यावेळी सर्व शिक्षकांनी मान्यता दिली. तसेच दुष्काळी परिस्थिती पाहता सत्कार समारंभ टाळण्याचे व स्वतः देखील सत्कार स्वीकारणार नसल्याचे कोहाकडे यांनी जाहीर केले. शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष माऊली पुंडे म्हणाले की, सर्व शिक्षकांनी मोठ्या मनाने मदतीचा हात दिला असून, शैक्षणिक कामाबरोबरच सामाजिक जबाबदारीचे जाण सर्व शिक्षकांना आहे. शिक्षकांच्या या उपक्रमाबददल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

  • पाणी टंचाई प्रसंगी शिक्षकांनी आवाहनाला प्रतिसाद देऊन, मोठ्या मनाने मदत करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. यामुळे तालुक्‍याचे नाव उंचावले आहे. समाजातील सर्वच स्तरामधून अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीला धावून जाण्याची भारतीय संस्कृती असून, त्याचे दर्शन येथे झाले आहे.
    -संदीप जठार, गटविकास अधिकारी शिरूर
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)