दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

कोल्हापूर: दुष्काळी भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सहाय्यभूत व्हावे, यासाठी दिवाळीनंतर चांगला पाऊस पडू दे आणि पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष संपू दे, असे साकडे महाराष्ट्राचे महसूलमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज श्री करवीर निवासीनी अंबाबाई/महालक्ष्मीला   घातले.

शारदीय नवरात्र उत्सवात सेवा बजावणाऱ्या विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्तींचा सन्मान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने आज श्री अंबाबाई मंदीरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर शोभाताई बोंद्रे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजी जाधव, संगिता खाडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सचिव विजय पवार, व्यवस्थापक धनाजी जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्याच्या अनेक जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक असून दुष्काळाच्या सर्व सुविधा शासनामार्फत प्राधान्याने राबविल्या जातील. राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, दुष्काळ जाहीर केलेल्या 151 तालुक्यात केंद्राच्या मदतीने दुष्काळाच्या 8 सुविधा प्राधान्याने लागू केल्या आहेत. दुष्काळाची तीव्रता असलेल्या उर्वरीत गावांनाही महाराष्ट्र शासन दुष्काळाच्या सुविधा उपलब्ध करून देईल. ज्या ठिकाणी 750 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या ठिकाणीही दुष्काळाच्या सर्व सुविधा देण्यास प्राधान्य दिले जाईल. मात्र नजिकच्या काळात दुष्काळी भागात पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर राज्य शासन आवश्यक उपाययोजना करेलच तथापि दिवाळीनंतर या भागात चांगला पाऊस होऊ दे आणि पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष संपू दे असे साकडे आपण श्री अंबाबाईच्या चरणी घातल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)