दुषित पाण्यामुळे होणारे विकार

डॉ. राजेंद्र माने

पावसाळा आला की वॉटरबोर्न अर्थात जलजन्य आजाराच्या प्रमाणात वाढ होते. हे आजार टाळता येणे सहज शक्‍य असते. मात्र त्यासाठी आपण आवश्‍यक ती काळजीच घेत नसल्याचे अनेकदा दिसून येते. त्यामुळे पावसाळा आला की आपण स्वत:वर काही निर्बंध लावून घेणे गरजेचे असते. त्याकडे दुर्लक्ष केले, तर मात्र विविध संसर्गजन्य रोगांची शिकार होणे क्रमप्राप्त ठरते.

दूषित पाणी पिण्यामुळे अतिसार होत असतो.
अतिसार म्हणजे काय ?
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी शौचास होणे याला अतिसार म्हणतात. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते व त्यामुळे त्वचा कोरडी पडते. यावर वेळीच उपचार केले नाहीत तर मृत्यूही येऊ शकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लक्षणे
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ जुलाब
जास्त तहान लागणे.
डोळे खोल जाणे.
जीभ व तोंड कोरडे पडणे.
अर्भकामध्ये टाळू खोल जाणे.
लघवी थोडी गडद रंगाची होणे किंवा लघवी न होणे.
गुंगल्यासारखे किंवा चिडखोर होणे.
कातडीस चिमटा काढल्यास अतिशय हळूहळू पूर्ववत होणे.
अतिसारावर उपाय व पथ्य
अतिसार झालेल्या व्यक्तीस रोजच्यापेक्षा जास्त पातळ पदार्थ द्यावे. उदा. तांदळाची पेज, सरबत, लस्सी, फिका चहा.
दिवसातून पाच पेक्षा जास्त वेळा पचनास हलके अन्न द्यावे.
जलसंजीवनी द्यावी.

वयाप्रमाणे जलसंजीवनी किती द्यावी?
तीन महिने – 1/2 लिटर
सहा महिने ते एक वर्ष – 1/2 लिटर
एक वर्ष ते पाच वर्ष – 3/4 लिटर
दोन वर्ष ते पाच वर्ष – 1 लिटर
पाच वर्ष ते पंधरा – 2 लिटर
पंधरा वर्षाचे वर – 2 ते 3 लिटर

जुलाब
मनुष्य निरोगी असताना मळाचा घट्टपणा ठरावीक असतो. तसेच मलविसर्जन दिवसातून बहुधा एकाच वेळेस होते. मात्र, काही आजारांत मळाचा पातळपणा वाढतो. याचे कारण लहान किंवा मोठ्या आतड्यात असू शकते. काही वेळा पाण्यासारखे जुलाब होतात. दिवसातून एकापेक्षा अधिक वेळा जावे लागते. काही आजारात रक्त व चिकट पदार्थही काही वेळा पडतात. शौचाला अर्धवट झाल्यासारखे वाटते. या सर्वांना जुलाब असे सामान्य नाव असले तरी त्यात प्रकार आहेत. लहान आतड्यात आजार असेल तर त्यातले अन्न व पाणी शोषले न जाता बहुतेक सर्व अन्नपाणी तसेच बाहेर पडते. त्यामुळे पातळ, पाण्यासारखे जुलाब होतात. कित्येक वेळा पोटात अन्न नसले तरी लहान आतड्यात पाणी, रस पाझरून त्याचेच जुलाब होतात. पातळ जुलाबांबरोबर काही वेळा कळ येते तर काही वेळा येत नाही. पटकी व अतिसारामध्ये हे जुलाब भाताच्या पेजेसारखे पांढरे येतात. पातळ जुलाबामध्ये रक्त सहसा पडत नाही. पटकीत व तसल्याच काही आजारांत जुलाब व उलट्या एकत्रच होतात. पण बहुधा उलटी आधी होते व मग जुलाब चालू होतात.

आव :
आजार जर मोठ्या आतड्यात असेल तर जुलाब फार पातळ होत नाहीत. यात बहुधा चिकट पदार्थ (व कधीकधी रक्त) पडते. बहुतेक वेळा पोटात कळ येते किंवा दुखत राहते. या प्रकाराला आमांश (आव) म्हणण्याची पध्दत आहे. हगवण हा शब्द दोन्ही प्रकारांच्या (लहान व मोठ्या आतड्यांच्या) आजाराला वापरतात. आवेत पडणारे रक्त आतड्याला जखमा झाल्याने पडते. या जखमा जंतूंच्या आक्रमणामुळे होतात. सर्वच प्रकारचे जंतू आतड्याला इजा करत नाहीत. शौचाला पातळ होणे हे लहानपणापासून सर्वांच्या अनुभवाचे असते. मात्र, यात खालीलप्रमाणे काही प्रकार असतात.
पाण्यासारखे पातळ जुलाब असल्यास अतिसार म्हणतात.
मळाला नुसता पातळपणा असेल तर हगवण म्हणतात. परंतु लोकभाषेत असा स्पष्ट फरक दिसून येत नाही.
आव हगवण (आमांश) दोन प्रकारची असते. रक्तशेंब असणारी व नुसती शेंब पडणारी.
हगवण हा शब्द दोन्ही प्रकारांना (लहान व मोठ्या आतड्याचा आजार) वापरतात. जुलाबात पडणारे रक्त मोठ्या आतड्यात जखमा झाल्याने पडते. या जखमा जंतूंच्या आक्रमणामुळे होतात. सर्वच प्रकारचे जंतू आतड्याला इजा करत नसल्यामुळे नेहमी रक्त पडत नाही. आजार लहान आतड्यात असेल तर त्यातले अन्न व पाणी शोषले न जाता बहुतेक सर्व अन्न-पाणी तसेच बाहेर पडते. त्यामुळे पातळ, पाण्यासारखे जुलाब होतात. पोटात अन्न नसले तरी लहान आतड्यात पाणी, रस पाझरून त्याचेच जुलाब होतात.
पातळ जुलाबाबरोबर काही वेळा कळ येते तर काही वेळा कळ येत नाही.
पटकी व अतिसारामध्ये हे जुलाब भाताच्या पेजेसारखे पांढरे असतात. पातळ जुलाबामध्ये सहसा रक्त पडत नाही.
पटकी व अशा काही आजारांत जुलाब व उलट्या एकत्रच होतात. पण बहुधा उलटी आधी येते व मग जुलाब चालू होतात.
आजार जर मोठ्या आतड्यात असेल तर जुलाब फार पातळ होत नाहीत. यात बहुधा चिकट पदार्थ (शेंब) व कधीकधी रक्त पडते. बहुतेक वेळा पोटात कळ येते आणि दुखत राहते. या प्रकाराला आमांश (आव) म्हणण्याचीही पध्दत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)