दुषित पाण्याची भांडी केली आडवी

कुरवली- प्राथमिक आरोग्य केंद्र सणसर अंतर्गत उपकेंद्र कुरवली येथे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरभेटी घेत पाणी साठवणची भांडी तपासून अडगळीत पडलेली पाणी साचलेली भांडी आडवी करीत दूषित पाण्याची विल्हेवाट लावली. डास उत्पत्ती स्थाने असलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले तसेच पाणी साठवलेली भांड्यात टेमिफॉस द्रावण टाकण्यात येत आहे. याशिवाय डेंग्यू विषयी माहिती पत्रिका वाटण्यात येत आहेत.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. जीवन सरतापे, डॉ. सुषमा गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक सुधाकर चाबुकस्वार, शिवाजी कोथमीरे, आरोग्य सेवक राहुल घुले यांनी कामकाज पाहिले. आरोग्य सेविका इंदुमती माने व सर्व आशा स्वयसेवीका यांची सहकार्य या कामी होत आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)