दुर्मिळ पक्षी, जुने स्टॅम्प अन् रुपयांवरील पक्ष्यांची अनोखी चित्रे

100 हून अधिक छायाचित्रे, प्रदर्शन ठरले लक्षवेधी

कराड –
 कराड येथे दोन दिवस सुरु असलेल्या पक्षीमित्र संमेलनाच्या निमित्ताने कलादालनात भरविण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनात देश-विदेशातील सुमारे 100 हून अधिक प्रजातींचे दुर्मिळ पक्षी पहावयास मिळत आहेत. पक्षीप्रेमींनी या प्रदर्शनाला भेटी देत छायाचित्रकारांच्या कलेला दाद दिली.

या प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधले ते सांगली येथील अजित पाटील यांनी स्वत: जमविलेल्या काही जुन्या स्टॅम्प व रुपयांवरील पक्ष्यांची अनोख्या चित्रांनी पक्ष्यांविषयीचे अनोखे प्रेम या प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यक्‍त झाले. अजित पाटील यांनी भारतातीलच नव्हे तर परदेशातील स्टॅम्प जमविले आहेत. त्यावर आकर्षक अशी पक्ष्यांची चित्रे आहेत. त्यांचेच अवलोकन करत त्यांची नात तत्वी नाईक हिनेही केले आहे. तिने देश-परदेशातील रुपयांवर असलेल्या पक्ष्यांची छायाचित्रे जमा करण्याचा छंद जोपासला आहे. तिने जमा केलेल्या रुपयांमध्ये भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, पोलिस्का, पोलॅंड, इंडोनेशिया, न्युझीलंड, जमायका, टॅरीनाड, अंटार्टिका, जमायका, झोकोल, कोरोना, झिबीया, सिंगापूर, प्रिन्सीपाई, व्हेन्सुलिना, तिबेट आदी देशातील पाच, दहा, वीस, शंभर रुपयांवर असलेल्या पक्ष्यांची छायाचित्रे एकत्रित जमवली आहेत.

-Ads-

अजित पाटील यांनी जमवलेले स्टॅम्प हे भारत, हॉंगकॉंग, पोलॅंड, पोलेस्को येथील आहेत. त्याचबरोबर या प्रदर्शनात विविध जातीची पक्ष्यांची छायाचित्रेही लावण्यात आली आहेत. या पक्षीमित्र संमेलनाच्या निमित्ताने गिधाड, गरुड, ससानासारखे शिकारी पक्षी, फ्लाय कॅचर, रॉबिन, किंग फिशर, खंड्या पक्ष्याच्या दुर्मिळ जाती, पॅरॉडाईज फ्लाय कॅचर, इंडियन रोलर, तांबट, ग्रीन पिझन यासह सुमारे 250 हून अधिक पक्षांची दुर्मिळ, शिकार करतानाची आकर्षक छायाचित्रे पहायला मिळत आहेत. छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांची छायाचित्रेही या प्रदर्शनात लावण्यात आलेली आहेत.

सांगलीचे अजित उर्फ पापा पाटील, राज ढगे, हेमंत केंजळे, रोहन भाटे, डॉ. अनिरुद्ध दिक्षीत यासह अन्य पक्षीप्रेमींनी टिपलेली छायाचित्रे प्रदर्शनात आहेत. तीन दिवस स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमधील कलादालनात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)