दुर्बिणीच्या साह्याने काढला तब्बल 9 से. मीचा “कीडनी स्टोन’

कराड – आधुनिक युगात सर्वच क्षेत्रामध्ये बदल होत असताना वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाला अनुसरुनच अनुभवी युरो-सर्जन डॉ. योगेश जाधव यांनी नुकतीच एक शस्त्रक्रिया केली. ज्यामध्ये 9 सेंटिमीटरचा किडनी स्टोन दुर्बिणीद्वारे बिन टाक्‍यांची शस्त्रक्रियेने काढून टाकण्यात आला. या शस्त्रक्रियेमुळे सह्याद्री हॉस्पिटलच्या लौकिकात भर पडला आहे.

सुदाम पाटील या 45 वयाच्या इसमास 9 सेंटिमीटरचा किडणी स्टोन झालेला होता. यावर उपचार करण्यासाठी पाटील यांनी अनेक डॉक्‍टरांची भेट घेतली. काहींनी टाक्‍याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. तर काहीनी किडनी काढून टाकण्याचा सल्ला दिला. नंतर पाटील यांनी डॉक्‍टर योगेश जाधव यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी पाटील यांची तपासणी करून सदरचा खडा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करुन काढला जाऊ शकतो असे सांगितले.
पीसीएनएल या दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेमध्ये खडा फोडून खड्याची पावडर करन बाहेर काढून टाकण्यात येते. या प्रक्रियेमध्ये कोणतेही टाके घालावे लागत नाही. टाक्‍याच्या शस्त्रक्रियेमध्ये बरकडीचे हाड काढावे लागते. व 10 ते 15 टाके घालावे लागतात. शिवाय रुग्णाला महिनाभर विश्रांती घ्यावी लागते. याउलट दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेत कोणतीही चिरफाड करावी लागत नाही. कोणतेही टाके घालावे लागत नाही. विशेष म्हणजे रुग्ण चार ते पाच दिवसातच कामावर रुजू होतात. विशेष महत्त्वाचे म्हणजे डायबेटिसची रुग्ण व हृदय विकाराचे रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर व सुरक्षित शस्त्रक्रिया आहे.

किडनी स्टोन हा सर्वसामान्यांमध्ये आढळणारा अत्यंत वेदनादायक आजार आहे. हा आजार 25 ते 45 या वयोगटामध्ये सामान्यतः आढळून येतो. पुरुषांमध्ये हा आजार स्त्रियांच्या तीन पटीने अधिक प्रमाणात आढळतो. सध्या भारतामध्ये 5 ते 7 दशलक्ष लोक या आजाराने ग्रासले आहेत. या आजारावर उपचार करताना रुग्णाची स्थिती, खड्याचा प्रकार, खड्याचे नेमके ठिकाण व इतर वैद्यकीय तपासण्या या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. अद्यावत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे टाके देऊन शस्त्रक्रिया करण्याची पद्धती आता हळूहळू मागे पडू लागली आहे. लोकांचा कल विना टाक्‍याच्या शस्त्रक्रियेकडे वाढला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)