दुर्गोत्सवाच्या तयारीला साताऱ्यात वेग

सार्वजनिक मंडळांच्या मंडप उभारणीस सुरूवात
सातारा- दुर्गोत्सवास आता केवळ आठ दिवस शिल्लक राहिले असताना साताऱ्यात आता तयारीला वेग आला आहे. शहरातील सार्वजनिक मंडळांच्या मंडप उभारणीस सुरूवात केली आहे तर कुंभारवाड्यासह इतरत्र मूर्ती जवळपास तयार झाल्याअसून आता रंगकाम हातात घेण्यात आले आहे.

साताऱ्यात गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गोत्सवाची देखील परंपरा आहे. शहर व उपनगरात 70 सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी मोठी परंपरा असलेल्या भारतमाता मंडळ, शिवाजी सर्कलसह बहुताशं मंडळांच्या मंडप उभारणीला सुरूवात झाली असून दोन दिवसात ते काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर आकर्षक सजावट देखील करण्यात येणार आहे. दुर्गोत्सवात दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी ही दांडीया,गरबाचे देखील आयोजन सातारा शहरात मोठ्या प्रमाणात होणार असल्याने आता प्रत्येकाला वेध प्रतिष्ठापनेचे लागले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)