दुर्गा टेकडीवर एकाची गळफास घेवून आत्महत्या

देहूरोड- देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निगड़ी येथील दुर्गा टेकडीवरील झाडाला एका पंचेचाळीस वर्षाच्या व्यक्तिने दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी (दि.15 ) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजु शकले नाही. शिवाजी भाऊराव मराठे ( वय 45, रा. रूपीनगर, निगड़ी ) असे गळफास घेतलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सतीश कांबळे यांनी देहूरोड पोलिसांना खबर दिली .

पोलिसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, तीश आणि त्याचा मित्र दुर्गा टेकडीवर लघुशंकेसाठी स गेला असता एका झाडाला गळफास घेतलेला लटकलेला मृतदेह दिसला. ही बाब त्याने पोलिसांना कळविली. आत्महत्येचे नेमके कारण समजु शकले नसुन शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन पवार करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)