दुर्गापुरचे कॅप्टन धनंजय मनकर

यांना सैन्यदलात मेजरपदी बढती 
लोणी  – राहाता तालुक्‍यातील दुर्गापूर येथील धनंजय मनकर यांची सैन्य दलामध्ये मेजरपदावर नुकतीच निवड झाली आहे. त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणानंतर बी. ई. कॉम्प्युटर ही पदवी संगमनेर येथून घेतली. त्यानंतर त्यांनी सैन्य दलामध्ये भरतीसाठी युनिव्हर्सिटी एंन्ट्री स्कीममधून स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. अतिशय मेहनतीने या स्पर्धा परिक्षेला ते समोरे गेले. 2013 मध्ये त्यांची सर्व प्रथम लेप्टनंट म्हणून निवड झाली. त्यानंतर 2014 मध्ये कॅप्टन आणि आता त्यांची मेजर म्हणून पदोन्नती झाली आहे. सध्या मेजर म्हणून 31 एफएडी युनीट पानागड, पश्‍चिम बंगाल येथे ते कर्तव्य बजावत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. ते दुर्गापूर येथील प्रगतशील शेतकरी शहाजी मनकर यांचे नातू व दत्तात्रय मनकर यांचे सुपूत्र, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे स्वीय सहाय्यक शिवाजी जाधव यांचे जावई आहेत. निवडीबद्दल मनकर यांचे ना. राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, डॉ. विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे व दुर्गापूर ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)