दुर्गापुजेसाठी सरकारी निधी देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार 

नवी दिल्ली: पश्‍चिम बंगाल सरकारने त्या राज्यांतील सुमारे 28 हजार दुर्गा पुजामंडळांना प्रत्येकी दहा हजार रूपये या प्रमाणे 28 कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. तथापी त्या निर्णयावर कोणतीही स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
मात्र या प्रकरणात पश्‍चिम बंगाल सरकारने त्यांची बाजू प्रतिज्ञापत्राद्वारे मांडावी अशी सूचना न्यायालयाने केली आहे. पण या निर्णयावर स्थगिती नसल्याने दुर्गा पुजा मंडळांना उत्सवासाठी प्रत्येकी दहा हजार रूपयांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने 10 सप्टेंबर रोजी हा निर्णय जाहीर केला आहे. तथापी यातून कोणतेही लोकहिताचे काम साधले जाणार नसल्याने इतका मोठा सरकारी निधी अशा प्रकारे वाया घालवू नये याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)