जोगवडी- उन्हाळ्यामध्ये भोर तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. धरण उशाशी कोरड घशाशी अशी बिकट अवस्था या लोकांची झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दुर्गम व डोंगरी भागामध्ये पाण्याच्या योजना पोहचविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे सदस्य विठ्ठल आवाळे यांनी सांगितले. भोर तालुक्यातील डेहेण, कोंडगाव, सांगवी गावांमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमीपूजन करण्यात आले. यामध्ये शिवकालीन पाणी साठवण टाक्या, नळपाणी पुरवठा योजना व अंगणवाडी सभामंडप आदींचा समावेश होता. यावेळी आयोजित कार्यक्रमत मारुती कंक, दत्तोबा मोरे, उपसरपंच विजय गोळे, डेहेण गावचे सरपंच संदीप दूरकर व सांगवी गावचे सरपंच राजेश रांजणे समवेत ग्रामस्थ उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0