दुरूस्तीच्या कामासाठी ससाणेनगर रेल्वेगेट बंद राहणार

हडपसर – ससाणेनगर येथील रेल्वे फाटकाच्या देखभाल-दुरूस्तीचे काम शनिवारी (दि.12) रात्री दहा वाजल्यापासून हाती घेण्यात आले आहे. सोमवारी (दि.14) सकाळी दहा वाजेपर्यंत रेल्वे क्रॉसिंग बंद राहणार आहे. त्यामुळे ससाणेनगर रेल्वे गेटवरील मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ससाणेनगरहून हांडेवाडी व सय्यदनगर-महंमदवाडीकडे ये-जा करण्यासाठी महत्वाचे असणारे ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग रविवारी बंद असणार आहे. त्यामुळे येथील काळेपडळ आणि रामटेकडी येथील रेल्वे क्रॉसिंवरील फाटक रस्ता वापरून वाहनचालकांना प्रवास करावा लागणार आहे. पालिकेने याठिकाणी अनेक पर्यायी मार्ग तयार केलेले आहेत. त्यात काळेपडळ येथून रवीपार्के, तसेच यशवंतनगर येथून मुख्य हांडेवाडी रोडवर येता येवू शकणार आहे. तसेच गायकवाड मळा येथून रामटेकडी येथे ये-जा कराता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)