दुरुस्तीसाठीची खड्डी रस्त्यावर

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, किरकोळ अपघातांच्या घटनेत वाढ
सातारा – सातारा शहरातील राधिका रोडवरील एका ओढ्यानजीक रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला खडीचे ढिग टाकण्यात आले आहेत. परंतु अद्यापही दुरुस्तीला प्रारंभ झाला नसल्याने पालिका प्रशासन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त शोधत आहे की काय? असा सवाल नागरिकांमधून होत आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेले खडीच ढीग आता रस्त्यावर पसरू लागल्याने याठिकाणी वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहेत. विशेषत: दुचाकीस्वारांना या खडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सातारा शहरातील रस्त्यांची गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यानंतर या रस्त्यांना दुरुस्ती मिळणे नागरिकांना अपेक्षित होते. मात्र, नागरिकांच्या सोयींची वावडे असलेल्या पालिकेकडून नेहमीसारखेच या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले आहे. सातारा शहरात असणाऱ्या राधिका मार्गावरील खड्डे मुजविण्यासाठी पालिकेने अनेक महिन्यांपासून रस्त्याच्याकडेला खडीचे ढीग टाकले आहेत. खडी टाकल्यानंतर रस्ता होणार या भोळ्या आशेने वाहनधारकांनामध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, महिनोंमहिने उलटले तरीदेखील पालिका प्रशासनाने या रस्त्यावरील खडीला हात देखील लावलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणखी किती काळ प्रतिक्षा करावी लागणार असा सवाल होऊ लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुरुस्तीसाठी रस्त्याकडेला टाकलेली खडी आता रस्त्यावर पसरू लागली आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा या खडीवरुन दुचाकी घसरण्याचे प्रकारही घडले आहेत आणि घडतही आहेत. मात्र, गांधारीच्या भूमिकेत असलेले पालिका प्रशासनाला याचे काहीही सोयीरसुतक राहिले नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)