दुरुस्तीनंतर 24 तासातच रस्ता पुन्हा उखडला

वाई-सुरुर रस्त्याचे दर्जाहिन काम : ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी
भुईंज, दि. 6 (वार्ताहर) – वाई-सुरुर या सुमारे 10 किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली होती. याप्रकरणी दैनिक प्रभातने वारंवार वृत्त प्रसिद्ध केल्याने नुकतेच या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, ठेकेदाराने अत्यंत दर्जाहिन काम केल्यामुळे अवघ्या 24 तासातच रस्ता उखडला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर प्रशासनाने कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असून तशी मागणीदेखील वाहनधारकांमधून होत आहे.
वाई सुरुर या 10 कि मी लांबीच्या रस्त्याची चाळण झाल्याने रस्त्यावर फुट ते दीड फुट खोल खड्डे पडले होते. खड्ड्यांमुळे रस्त्यावर भीषण अपघातांची मालिका सुरु झाल्याने त्यात अनेक वाहन चालकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या नोंदीदेखील वाई व भुईंज पोलिस ठाण्यात आढळून येतात. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याने वाईच्या बांधकाम विभागाने
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हालचाली सुरु केल्या. उप अभियंत्यांनी हा रस्ता तातडीने तसे प्रस्ताव तयार करुन राज्य सरकारकडे पाठवले होते. राज्य सरकारने 1 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजुर करुन त्या कामाचे ऑनलाईन टेंडर काढले. अनेक ठेकेदारांनी टेंडरही भरले पण सातारा येथील छाबडा कंपनीने इतर ठेकेदारांच्या टेंडर किमती पेक्षा 18 टक्के कमी दराने टेंडर भरल्याने त्यांना कमाचा ठेका मिळाला. गेल्या तिन दिवसांपासून वाईच्या बांधकाम खात्याचे उपअभियंता श्रीपाद जाधव आणि शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डांबरी करणाच्या कमाला सुरुवातही झाली. मात्र, छाबडा कंपनीने उप अभियंता जाधव यांची नजर चुकवुन डांबराचा कमी वापर करुन जोमाने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने 24 तासाच्या आतच वाहनांच्या वजनाचा भार रस्त्याला पेलवत नसल्याने खडी उखडून गेल्याने जागोजागी खड्डे पडले आहेत.
वाई तालुक्‍यातील जोशीविहिर येथील डांबरीकरणाचे कामही याच छाबडा कंपनीने घेतले होते. या रस्त्याचेही भर पावसात डांबरीकरण केल्याने त्या रस्त्यांचीही चाळण झाली आहे. त्यामुळे अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याएवजी शासन त्यांना कोट्यवधी रुपयांची कामे देत असल्याने नागरिकांसह वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभागाचे उपअभियंत्ता जातीने उभे राहुन काम करुन घेत असताना देखील या कंपनीमार्फत डांबर कमी वापरण्याचे उद्योग सुरुच आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला यापुढेतरी कामे न देण्याचे शहाणपण संबंधित विभागाने दाखवावे, अशी मागणी वाई तालुक्‍यातील जनतेतून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)