दुरावलेले चारही बछडे पुन्हा आईच्या कुशीत

संग्रहित फोटो

टाकळी हाजीच्या तामखरवाडीतील घटना, वनविभागाचे कौतुक

शिरूर – टाकळी हाजी (तामखरवाडी) शेतकरी आदर्श शिक्षक सुनील करू खोमणे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याच्या मादीचे चार बछडे आढळून आले. त्याच दिवशी जेथे पिल्ले सापडली तेथे प्लॅस्टिक क्रेटमध्ये पिल्ले ठेवली. अखेर रात्री दहा वाजता बिबट्या मादीने आपली पिल्ले घेऊन गेल्याचे दिसून आले.

तामखरवाडी येथे खोमणे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याच्या मादीचे चार बछडे आढळून आले. त्यावेळी बिबट्याची मादी ऊस कामगारांवर धावली; मात्र लोकांनी हुसकावल्याने जवळच असलेल्या उसाच्या शेतात ती गेली. त्यावेळी सुनील खोमणे यांनी तत्काळ वन विभागाला संपर्क केला असता, वनविभागाचे अधिकारी विठ्ठल भुजबळ, प्रवीण क्षीरसागर, एस. एस. तांदळे, वनपाल दहातोंडे हे तत्काळ हजर झाले. त्यावेळी चार बछडे एका क्रेटमध्ये ठेवून उसात ठेवण्यात आले. त्यावेळी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली असता भुजबळ म्हणाले की, पिंजरा लावला तर बिबट्या जेरबंद होईल; परंतु बछडे वाचवण्यासाठी मादीला जेरबंद करता येणार नाही. मागील आठवड्यात खोमणे यांच्या मालकीच्या दोन करडांना बिबट्याने फस्त केले होते; परंतु बिबट्याची पिल्ले सापडल्यानंतर देखील खोमणे यांनी वनखात्याच्या ताब्यात देऊन त्यांचा वन्यप्राण्यांप्रती असलेला जिव्हाळा दिसून आला. वनखात्याचे अधिकारी दिवसभर पिलांवर संरक्षण म्हणून लक्ष ठेवून होते. रात्री मादी येऊन पिलांना घेऊन जाईल असे भुजबळ यांनी सांगितले. वनखात्याचे कर्मचारी यांनी त्याच ठिकाणी रात्री सात वाजता प्लॅस्टिक क्रेटमध्ये चारही बिबट्याची पिल्ले ठेवून त्यावर आणखी प्लॅस्टिक क्रेट ठेवले. त्या ठिकाणी चार ट्रेप कॅमेरे लावले रात्री साडेसात ते रात्री दहाच्या दरम्यान मादी बिबट्याने आपली पिल्ले घेऊन गेल्याचे लावलेल्या पैकी ट्रेप कॅमेऱ्यात दिसून आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)