दुरांतो एक्‍सप्रेसच्या अपघातामुळे खोळंबलेली रेल्वे वाहतूक काही प्रमाणात सुरू

पंचवटी एक्‍सप्रेस मुंबईकडे रवाना

नाशिक – दोन दिवसांपुर्वी आसनगाव जवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेमुळे खोळंबलेली रेल्वे वाहतूक आता काही प्रमाणात पुर्वपदावर आली आहे. आज सकाळी पंचवटी एक्‍सप्रेस मुंबईकडे रवाना झाली.

मध्य रेल्वेवर आसनगाव जवळ दुरांतो एक्‍सप्रेसचे डबे दोन दिवसांपूर्वी घसरले होते. यामुळे रेल्वे वाहतूक दोन दिवस बंद होती. आज हळूहळू रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत आहे. आज सकाळी पंचवटी एक्‍सप्रेस नाशिकवरून मुंबईकडे रवाना झाली. मात्र गोदावरी आणि राज्यराणी एक्‍सप्रेस तिसऱ्या दिवशीही रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या 3-4 तास उशिरा धावत आहेत. आज संध्याकाळपर्यंत रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)