दुय्यय निबंधक कार्यालयाला एजंटचा विळखा

दहिवडी ता माण येते दुय्यम निबंधक कार्यालयात व दस्त करण्यासाठी थांबलेले नागरिक.

गोंदवले, दि. 13 (प्रतिनिधी) – शासनाच्या तुकडाबंदी आदेशामुळे जमिनीच्या गुंठेवारीचे दस्त करण्यावर सर्वत्र बंदी आहे. मात्र माण तालुक्‍यात असे अनधिकृत दस्ताचे काम आजही सुरू आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांबरोबर काही एजंट मालामाल झाले आहेत. सर्वसामान्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न नागरिक करत असून एजंटांना आवर घाला, अशी मागणी होत आहे.
माण तहसील कार्यालयाच्या आवारात दुय्यम निबंधक कार्ययालयातून जमीनीचे दस्त केले जातात. सध्या सरकारने सर्वत्र जमीनीचे गुंठावारीचे दस्त करण्याचे काम बंद केलेलं आहे. तरीही तुकडाबंदी आदेशाला डावलून मुख्य अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर कामे सुरू आहेत. गुंठेवारींचे दस्त करणे हे अधिकारी व एजंटांसाठी मोठे कुरणच बनले आहे. एक गुंठ्याचा एक दस्त करण्यासाठी खरेदीदारकडून 25 ते30 हजारांची रक्कम टेबलाखालून घेतली जात असल्याची चर्चा आहे. दिवसभरात अशा प्रकारचे अनेक दस्त करून निबंधकासह एजंट अल्पावधीतच मालामाल झाले आहेत. या कामासाठी काही मुद्रांक विक्रेते व रायटरदेखील पुढाकार घेत आहेत. शासनाच्या तुकडा बंदीच्या आदेशामुळे दस्त करताना अडचण झाल्यास काही एजंट संबंधित पार्टीकडून अ ‘मोल’ ठरवून घेतात व नंतर लक्ष्मीदर्शनाचा लाभ झाल्यावर ही प्रकरणं दुय्यम निबंधक कार्यालयात पोहचवली जातात. तिथं असणाऱ्या शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळे नवसाला पावतात. जनतेला स्टॅम्प ड्युटी किती आहे? चलन किती भरल गेलं? हे काहीच समजत नाही.
जे दस्त सर्वसामान्य माणसाला होत नाहीत ते दस्त तालुक्‍यातील चार ते पाच दलाल दोन दिवसात करून देत आहेत व अव्वाची सव्वा रक्कम नागरिकांकडून घेत आहेत. याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे

जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालण्याची गरज
हे कार्यालय नेहमीच चर्चेत राहिले आहे. येथे काही वर्षापुर्वी एका मृत महिलेचा दस्त केला गेला असूनही जमिन पवनचक्की कंपनीने घेतली आहे. शिवाय यांची 7/12 वर नोंदही झाली आहे. याचा अर्थ येथे लाखों रूपये फेकले असणार आहेत. तसा गुन्हाही दाखल करण्यात आला असून त्यात सबंधित सहाय्यक निबंधक, नोंद करणारे तलाठी व सर्कल यांना क्‍लिन चीट देण्यात आली आहे. सध्या येथे गुंठेवारीचा दस्त करताना पेन्सिलने खरेदीदाराची जमीन असल्याचे दाखवून एक नामी शक्कल लढवून दस्त केले जात आहेत व तुकडाबंदीच्या आदेशाला कात्रजचा घाट दाखवून मलिदा गोळा केला जात आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)