दुय्यम निबंधक कार्यालये दि. 30 मार्च रोजी राहणार सुरू

पुणे – राज्यात 1 एप्रिलपासून रेडिरेकनरचे नवे दर लागू होतात. त्यामुळे 31 मार्चअगोदर दस्त नोंदणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. दि.29 व 30 मार्चला शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे राज्याच्या नोंदणी विभागाने दि.30 मार्चला दस्त नोंदणीसाठी राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 31 मार्चला दस्त नोंदणीसाठी होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

राज्यात दरवर्षी एक एप्रिलपासून रेडिरेकनरचे दर अर्थात वार्षिक बाजारममूल्य दर लागू होतात. आर्थिक वर्षसंपण्यापूर्वी ठरलेले व्यवहारांची पूर्तता करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होते. 29 मार्चला महावीर जयंती तर 30 मार्चला गुड फ्रायडेची शासकीय सुट्टी आहे. सलग दोन दिवस सुट्या आल्यास 31 मार्चला दस्त नोंदणीसाठी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या दिवशी संगणक यंत्रणेवर ताण येण्याची शक्‍यता आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने दि.30 मार्चला राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी सर्व दुय्यम निबंधक कार्यालये नेहमीच्या वेळेत सुरू राहणार असल्याचे परिपत्रक नोंदणी विभागाने जारी केले आहे. नोंदणी विभागाच्या या सुविधेमुळे दस्त नोंदणीसाठी 31 मार्चला होणारी गर्दी टळण्यास मदत होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)