दुय्यम निबंधक कार्यालयातील “इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी’ घोळ!

वडगाव मावळ : बीएसएनएल इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी बंद असल्याने दुय्यम निबंधक कार्यालयात केवळ अधिकारी व कर्मचारी उपलब्ध तर कारभार ठप्प झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
  • नागरिकांचे हाल : खरेदी-विक्री दस्त नोंदणीसह अन्य दस्त नोंदणी ठप्प

वडगाव मावळ – येथील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी बंद असल्याने येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी-विक्री दस्तनोंदणी व अन्य दस्तनोंदणी मंगळवारी (दि.15) व बुधवारी (दि.16) रोजी दिवसभर ठप्प झाले. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. बीएसएनएल “इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी’ त्वरित सुरू करून बीएसएनएल “इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी’ला पर्याय इंटरनेट सेवा वापरण्याची मागणी नागरिकांनी केले.

बीएसएनएलच्या गलथान कारभारामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला. बीएसएनएल केवळ नावालाच असून, सतत बंद बीएसएनएल गुरुवारी (दि.17) रोजी इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी येईल का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुणे आणि मुंबई दोन महानगराच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्‍यातील जमिनीला सोन्याचा भाव आहेत. वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दैनंदिन जमीन , प्लॉट, फ्लॅट व अन्य स्थावर मालमत्ता व मिळकतीचे खरेदी व विक्री दस्तनोंदणी मोठ्या प्रमाणात सुरू असते. या कार्यालयातून शासनाला वार्षिक कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. मावळ तालुक्‍यात जमीन खरेदी-विक्री दस्त नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

या कार्यालयात बीएसएनएल इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी वापरण्यात येत आहे. मावळ तालुक्‍यात बीएसएनएल इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीचे केबल जमिनीतून टाकले आहेत. दैनंदिन रस्ते खोदाई केल्याने वारंवार बीएसएनएल इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीचे केबल तुटल्याने वारंवार इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी बंद पडते. मंगळवारी (दि.15) व बुधवारी (दि.16) रोजी दिवसभर दुय्यय निबंधक कार्यालयातील जमीन खरेदी विक्रीचे दस्तनोंदणी काम ठप्प झाले आहे.

जमीन, प्लॉट, फ्लॅट खरेदी-विक्री दस्त नोंदणीसाठी जमीन विक्रेते व साक्षीदार यांना मोठ्या कष्टाने जमवाजमव केली जाते. त्या दुय्यम निबंधक कार्यालयातील बीएसएनएल इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी बंद असल्याने त्यांचा वेळ व पैसे वाया जातो. याशिवाय बीएसएनएल इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी सुरू होण्याची प्रतीक्षा करत तासन्‌तास नागरीक प्रतीक्षा करत बसले होते.

शासकीय कार्यालय असल्याने बीएसएनएल इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी वापरण्याचे आदेश असल्याने अन्य इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी वापरण्यास मनाई असल्याने बीएसएनएल इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे नागरिकांचा पैसा व वेळ वाया जात असून, शासनाचा महसूल बुडत आहे. एरवी प्रचंड वर्दळीचे असलेले दुय्यम निबंधक कार्यालय आज बीएसएनएल इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी बंद असल्याने ओस पडल असून, केवळ अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होते. नागरिकांना लोणावळा व तळेगाव दाभाडे या कार्यालयात जावे लागत आहे. त्या ठिकाणीही बीएसएनएल इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी बंद असल्याने नागरिकांची दमछाक होत आहे. तसेच बीएसएनएल मोबाईल, इंटरनेट बंद असल्याने बॅंक, शासकीय कार्यालयाचे कामकाज बंद आहे.

बीएसएनएल इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी त्वरित सुरू करून पर्यायी इंटरनेट सेवा वापरून नागरिकांची गैरसोय टाळण्याची मागणी ऍड. विजय जाधव, ऍड. अजित वहिले, ऍड. रोहित शेटे, ऍड. संजय भसे, ऍड. अजिंक्‍य यादव, ऍड. शाम ढोरे, कॉंग्रेस तालुका संघटक राजू शिंदे, माजी उपसरपंच विशाल वहिले, अतुल वायकर, शरद मालपोटे, दिनेश पगडे आदींनी केली.

मंगळवार व बुधवार या दोन दिवसांपासून दुय्यम निबंधक कार्यालयातील खरेदी-विक्री दस्त नोंदणी बंद आहे. बीएसएनएल कार्यालय मावळ व पुणे येथे वारंवार कनेक्‍टिव्हिटी कायमस्वरूपीचे देण्याची मागणी केली आहे. तरी वारंवार कनेक्‍टिव्हिटी जात असल्याने नागरिकांच्या रोषाला आम्हाला बळी पडावे लागत आहे. काही वेळा नागरिक हमरीतुमरी होते.
– राज नाईक, दुय्यम निबंधक अधिकारी.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)